• Fri. Mar 6th, 2026
    Thane News: मध्यपूर्वेतील परिस्थिती गंभीर, ठाणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर; परदेशातील नागरिकांसाठी विशेष मदत कक्ष सुरू

    इराण-इस्रायल, अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. परदेशात असलेल्या नातेवाईकांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी यांनी २४ तास हेल्पलाईन आणि विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.

    इराण इस्रायल युद्धावर ठाणे प्रशासन सतर्क(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, ठाणे : इराण–इस्रायल यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण आणि संभाव्य युद्धजन्य परिस्थितीची दखल घेत ठाणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे. परदेशात वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांबाबत चिंतेत असलेल्या नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून २४ तासांची हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.

    नियंत्रण कक्ष सुरू

    जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती देताना सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचे सदस्य इराण किंवा इस्रायलमध्ये नोकरी, व्यवसाय अथवा शिक्षणानिमित्त वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत त्या देशांतील घडामोडींमुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.

    अफवांवर विश्वास ठेवू नका

    नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. परदेशात असलेल्या व्यक्तींबाबत माहिती हवी असल्यास संबंधितांनी थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. प्राप्त झालेल्या चौकशीची नोंद घेऊन मंत्रालयातील राज्य आपत्कालीन संचालन केंद्राशी समन्वय साधला जाईल. त्यानंतर संबंधित भारतीय दूतावासांमार्फत आवश्यक माहिती मिळवून ती संबंधित कुटुंबीयांना कळविण्यात येणार आहे.

    Maharashtra TimesNagpur Crime: ‘माझ्या बहिणीला मेसेज का पाठवलेस?’ जाब विचारत दोन गटात राडा, 17 वर्षीय तरुणाला संपवलं, दोघे गंभीर जखमी

    आपत्कालीन यंत्रणा सज्ज

    संकटसमयी नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन कटिबद्ध असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे पोलीस नियंत्रण कक्ष तसेच मंत्रालय नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले असून नागरिकांनी गरज भासल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इराण–इराक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे प्रशासनाची ही तत्परता नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

    Maharashtra TimesDubai Attack: आमच्या हॉटेलच्या शेजारी स्फोट झालाय, आम्हाला लवकर घरी न्या; घाबरलेल्या मराठी पर्यटकांची सरकारला आर्त हाक

    दरम्यान, इराण- इस्रायल यांच्यातील हल्ले आता वाढताना दिसत आहेत. या युद्धजन्य परिस्थितीने इराणमधील २०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचाही मृत्यू झाला आहे. एवढचं नाही तर त्यांच्या जागी नेमण्यात आलेले नवे सर्वोच्च नेते अलीरेजा अराफी यांचाही हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा