• Sun. Sep 6th, 2026

धनुष्यबाणावरून सचिन अहिर-नार्वेकरांचा मिश्किल संवाद; राम कदमांच्या दहीहंडी कार्यक्रमात फटकेबाजी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना नाव आणि धनुष्यबाणच्या लढाईचा निकाल अंतिम टप्प्यात असतानाच एक महत्त्वाचा व्हिडिओ समोर आला आहे. नुकतेच ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत गेलेले आमदार सचिन अहिर, भाजपचे आमदार राम कदम आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यातील मिश्किल संवाद सध्या व्हायरल होतो आहे. झालं असं की दहीहंडी निमित्त घाटकोपर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महायुतीतील नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तर धनुष्यबाणावरून अहिर आणि राम कदम यांच्यात शाब्दिक फटकेबाजी रंगली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed