Crime News: शासनाची फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपावरून विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शासनाची लाखो रुपयांची फसवणूक अन् तब्बल ६ महिन्यांपासून फरार; महिला तलाठ्याला अखेर अटक(फोटो– Lipi)
राहुरी: शासनाकडून आपत्तीग्रस्त आणि पात्र लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मदत व सानुग्रह अनुदानाच्या वाटपात नियमबाह्य पद्धतीचा अवलंब करून शासकीय निधीचे आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपाने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तब्बल सहा महिन्यांपासून फरार असलेल्या महिला तलाठ्यास अखेर राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. मंगल रूपचंद दुशिंगे असे अटक करण्यात आलेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे. माहेगाव येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असताना सन २०२२ ते २०२३ या कालावधीत मदत व पुनर्वसन विभागाच्या अनुदान वाटपात नियमांचे पालन न करता ३ लाख ६५ हजार ३४० रुपयांचे अनुदान वितरित केल्याचे चौकशी अहवालातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौकशी समितीच्या अहवालाने उघड झाला कारभार
मंगल दुशिंगे या माहेगाव येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असताना मदत व सानुग्रह अनुदानाच्या वाटपात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या चौकशी अहवालात सन २०२२ ते २०२३ दरम्यान ३ लाख ६५ हजार ३४० रुपयांचे अनुदान नियमबाह्य पद्धतीने वितरित केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुन्हा ; अखेर आरोपी पोलिसांना शरण
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि तत्कालीन तहसीलदारांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केल्यानंतर मंडल अधिकारी विजय बबनराव बेरड यांच्या फिर्यादीवरून एप्रिल २०२६ मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगल दुशिंगे या पोलिसांच्या हाती लागत नव्हत्या. तब्बल सहा महिन्यांपासून त्यांचा शोध सुरू होता. फरार असलेल्या मंगल दुशिंगे अखेर ५ सप्टेंबर २०२६ रोजी राहुरी पोलिसांसमोर हजर झाल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. या अटकेनंतर शासकीय अनुदानाच्या वाटपातील गैरप्रकाराच्या तपासाला वेग आला आहे.
जालन्यातही १२ लाखांच्या अपहाराची चर्चा
मंगल दुशिंगे यांनी जालना जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने १२ लाख २४ हजार ८०२ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राहुरीतील प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील कथित संगनमत आणि आर्थिक व्यवहारांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव आणि पोलीस नाईक गणेश लिपणे करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा