• Fri. Mar 6th, 2026
    VSR चे मालक रोहित सिंह यांना अटक करा, व्हिडिओ शेअर करत अजितदादांचे पुत्र जय पवारांची मागणी

    Jay Pawar on VSR Company : व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह हे मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत, असं लिहित जय पवारांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

    जय पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : वीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर विमान उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत, या निष्काळजी प्रकरणी त्यांना अटक करा, असं लिहित दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. माझ्या वडिलांना आपण गमावलंच, आता एका मुलाची आर्त हाक आहे, असं सांगत जय पवार यांनी डीजीसीएकडे कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे जय पवार यांनी स्पष्ट केलेलं नाही.

    जय पवार यांची पोस्ट काय?

    “माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह हे मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे” असं जय पवार यांनी लिहिलं आहे.
    Maharashtra TimesRajyasabha Election : राज्यसभेच्या सातही जागांवर उमेदवार उतरवा, अमित शाहांच्या थेट सूचना, अतिरिक्त 20 मतांसाठी महायुतीची जुळवाजुळव
    “मी डीजीसीएला ठामपणे मागणी करतो, की या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत व्हीएसआरची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावी, रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.” अशी आग्रही मागणी जय पवार यांनी केली आहे.”ही एका मुलाची आर्त हाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी” अशी भावनिक सादही जय पवारांनी घातली आहे.
    Maharashtra TimesAjit Pawar : अजितदादांचं विमान जमिनीवर आदळताच पायलटचे शेवटचे शब्द काय? AAIB च्या 22 पानी अहवालात माहिती समोर

    पाहा व्हिडिओ :

    ‘पार्थ-जय’कडून पहाटेच पाहणी

    बारामती असो, की पुण्यात भल्या पहाटे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकाऱ्यांसह विकासकामांची पाहणी करणे हा अजितदादांचा नेहमीचाच शिरस्ता; परंतु महिन्यापूर्वी दादांच्या झालेल्या अपघाती निधनानंतर विकास कामांची पाहणी असो, की मॅरेथॉन बैठका हे सगळे काही थांबले आहे. त्यामुळे दादांची उणीव सातत्याने बारामतीकरांना जाणवत आहे. त्याचवेळी पार्थ आणि जय पवार यांनी रविवारी भल्या पहाटेच बारामतीतील विकासकामांची पाहणी केली. दोघांच्या पहाटेच्या पाहणीची दिवसभर बारामतीत चर्चा रंगली होती.

    Parth Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर घातपाताचा संशय, पण पार्थ पवार बोलत का नाही ?

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा