पुणे: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला नव्याने मिळालेल्या ‘एमएच ६१’ वाहन नोंदणी क्रमांक मालिकेला वाहनधारकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. दुचाकींसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एमएच ६१ बी’ मालिकेतील बहुतांश क्रमांक अवघ्या सात दिवसांत नोंदवले गेले असून, पुढील एका दिवसात ही मालिका संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आरटीओ’ प्रशासनाने आता दुचाकींच्या पसंती क्रमांकासाठी ‘एमएच ६१ सी’ ही मालिका सुरू केली आहे.
पुण्याची ओळख असलेल्या ‘एमएच १२’ मालिकेतील उपलब्ध क्रमांक संपल्यानंतर पुणेआरटीओला ‘एमएच ६१’ हा नवीन नोंदणी क्रमांक देण्यात आला. पुण्याची ओळख कायम ठेवण्यासाठी ‘एमएच १२’ हीच मालिका पुढे सुरू ठेवावी, अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही.
दुचाकींच्या ‘एमएच ६१ बी’ मालिकेतील बहुतांश क्रमांक केवळ सात दिवसांत संपले आहेत. आता ‘एमएच ६१ सी’ मालिका सुरुवातीला पसंती क्रमांकांसाठी खुली आहे. वाहनधारकांना आठ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत अर्ज करता येईल. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी एका क्रमांकासाठी जास्त अर्ज आलेल्यांचा लिलाव होईल. त्यानंतर नऊ सप्टेंबरपासून ही मालिका दुचाकी वाहनधारकांसाठी खुली होणार आहे.
‘नऊ’साठी सर्वाधिक बोली
दुचाकीच्या ‘एमएच ६१बी’ नवीन मालिकेत आकर्षक आणि व्हीआयपी क्रमांकांसाठीही मोठी चुरस पाहायला मिळाली. पसंतीच्या क्रमांकांसाठी आरटीओकडे तब्बल एक हजार ८२ अर्ज दाखल झाले होते. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्याने लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये ‘९’ या सिंगल डिजिट क्रमांकासाठी सर्वाधिक तीन लाख ७१ हजार रुपयांची विक्रमी बोली लागली. त्याचबरोबर ६, ५, ५५५, १२३४ आणि ९९०९ या आकर्षक क्रमांकांसाठीही वाहनधारकांनी मोठी रक्कम मोजली.
पुणे आरटीओकडून ‘एमएच ६१ए’ ही चारचाकीसाठी मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेतील तीन हजार क्रमांकाची नोंदणी झाली आहे. येत्या काळात सणांच्या पार्श्वभूमीवर ही मालिकाही लवकर संपण्याची शक्यता आहे. नवीन क्रमांक असतानाही वाहनधारकांनी चारचाकीच्या ‘एमएच ६१ए’ला पसंती दिल्याचेे चित्र आहे.
आरटीओ वाहन नोंदणीच्या एका सीरीजमध्ये नऊ हजार ९९९ क्रमांक असतात. पुण्यात दुचाकीसाठी सुरू केलेली मालिका संपण्यास पंधरा दिवस लागतात. कधी-कधी दसरा दिवाळी, पाडवा सणाच्या वेळी आठवड्यातही मालिका संपते; तर कारची सीरीज संपण्यासाठी एक ते दोन महिने लागतात; पण ‘एमएच ६१’ मधील बी क्रमांकाची मालिका आठ दिवसात संपत आहे. कारण, पूर्वी तीन ते चार दिवस नोंदणी बंद होती; तसेच सणांचा कालावधी सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुचाकीच्या मालिकेला पसंती दिली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा