• Fri. Sep 18th, 2026
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार? इराण-इस्रायल युद्धाचा भडका; कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ

Petrol Diesel Price: काही दिवसांपूर्वीपर्यंत प्रतिबॅरल ६९ डॉलर असलेल्या कच्च्या तेलाचा दर शनिवारी ७३ डॉलरवर पोहोचला आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजार उघडल्यानंतर हा दर किती वर जातो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

पेट्रोल- डिझेल दर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (क्रुड ऑइल) किमतींनी उसळी घेतली आहे. आगामी काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

जर युद्धाची तीव्रता वाढली, तर हे दर रशिया-युक्रेन युद्धावेळच्या ९० डॉलरच्या स्तरालाही पार करू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. भारताची कच्च्या तेलाची आयात प्रामुख्याने ‘रेड सी’ मार्गे होते. युद्धामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. परिणामी, आता पर्यायी लांबच्या मार्गाने तेल आणावे लागणार असल्याने दळणवळण खर्चात मोठी वाढ होणार आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळी कच्च्या तेलाचा दर ९० डॉलर असताना डॉलर ७८ रुपयांवर होता. मात्र, आता डॉलरचा दर ९० रुपयांच्या घरात आहे.

Maharashtra TimesNagpur Blast: कसा नियतीचा फेर हा आला! कुणी आई गमावली, तर कुणी पत्नी; नागपूरच्या भीषण स्फोटात अनेक संसार उघड्यावर
कच्च्या तेलाचे दर वाढल्यास रुपयाच्या कमकुवत मूल्यामुळे भारताला अधिक परकीय चलन मोजावे लागणार आहे. यापूर्वी जेव्हा कच्चे तेल ९० डॉलरवर गेले होते, तेव्हा देशात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १२२ रुपये तर डिझेल १०५ रुपयांवर पोहोचले होते. आताची परिस्थिती त्यापेक्षाही गंभीर होण्याची शक्यता आहे. देशासाठी दिलासादायक बाब म्हणजे, भारताकडे सध्या तीन महिने पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे, ज्याला तांत्रिक भाषेत ‘बफर स्टॉक’ म्हटले जाते.

Maharashtra TimesNagpur Blast: नागपूरच्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; 18 गंभीर जखमी, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
याशिवाय, काही कच्च्या तेलाची जहाजे भारताकडे येण्याच्या मार्गावर आहेत. जर कच्च्या तेलाचे दर असेच वाढत राहिले आणि युद्ध लांबले, तर केंद्र सरकारला नाईलाजाने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करावी लागेल, अशी माहिती महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दिली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.आणखी वाचा