• Mon. Sep 21st, 2026
महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर


Marathi Live News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वादग्रस्त विधानाप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या प्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी भिवंडी न्यायालयात हजेरी लावली. या प्रकरणात त्यांच्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे जामीनदार राहिले असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते निघून गेले. दरम्यान, पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोलनाक्याजवळ भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे पेपर नागपूरमध्ये फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed