IIT Bombay Student Death : प्रा. सूर्यनारायण डूल्ला हे १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या ‘मिड-सेमिस्टर’ परीक्षेदरम्यान पर्यवेक्षणाचे काम करत होते. त्यावेळी त्यांना एका विद्यार्थ्याकडून शैक्षणिक गैरप्रकार (म्हणजेच परीक्षेदरम्यान अनधिकृतपणे स्मार्टफोन जवळ बाळगणे आणि त्याचा वापर करणे) केला जात असल्याचे निदर्शनास आले होते, असे निवेदन जारी करण्यात आले आहे
साहिलचे हॉस्टेलमध्ये आयुष्य संपवलं
साहिल रवींद्र वाकोडे हा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून तो आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. शुक्रवारी सायंकाळी पवई कॅम्पसमधील होस्टेल क्रमांक चारमधील खोलीत छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला.
परीक्षेत चॅटजीपीटी वापरल्याचा आरोप
मध्य सत्राच्या परीक्षेदरम्यान मोबाइल फोन आणि ‘चॅटजीपीटी’चा वापर केल्याचा आरोप त्याच्यावर होता. परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा मजकूर चॅटजीपीटीवर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे आयआयटी मुंबईने म्हटले आहे. मात्र, या प्रकरणी त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.
Electric Shock : आम्ही गमावलेलं मूल परत येणारे का? गणरायाच्या दर्शनावेळी शॉक, चिमुरडीचा करुण अंत, नातेवाईकांचा उद्विग्न सवालपरीक्षेतील प्रकारानंतर संबंधित प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी साहिलशी चर्चा करून त्याचे समुपदेशन केले होते. या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरित परिणाम होणार नाही, असे त्याला आश्वस्त करण्यात आल्याचे आयआयटीकडून सांगण्यात आले. त्यानंतर तो होस्टेलमधील आपल्या खोलीत परतला आणि त्याच दिवशी सायंकाळी त्याचा मृतदेह आढळला.
जातीय भेदभावाचा कुटुंबाचा आरोप
साहिलच्या पालकांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी शनिवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. साहिलला संस्थात्मक पातळीवर छळाला सामोरे जावे लागले तसेच जातीय भेदभाव करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
Crime News : शनिवारी परत येईन… युवराजचा जीव गेलेला, तरी दोन दिवस कुटुंबाला WhatsApp मेसेज येत राहिले; बहिणीला संशय अन् पर्दाफाश
विद्यार्थ्यांचं आंदोलन
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनीही आंदोलन केले. साहिलवर शैक्षणिक निलंबनाची कारवाई होण्याची भीती दाखवून त्याच्यावर दबाव आणण्यात आल्याचा दावा आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे. या सर्व आरोपांची आता गुन्हे शाखेकडून तपासणी केली जाणार आहे.
आयआयटी मुंबई प्रशासनाने मात्र संस्थेत जातीय भेदभाव झाल्याचा आरोप नाकारला आहे. साहिल यांच्याविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.
BMW Car Crash : कोस्टल रोडवरुन BMW उडून पडली, प्राण सोडले तरी शनयचा पाय ॲक्सिलरेटरवरच, एक मित्र 20 फूट दूर फेकला गेला, अपघाताचा थरार समोर
आयआयटी मुंबई फॅकल्टी फोरम
‘आम्ही आमचे सहकारी प्रा. सूर्यनारायण डूल्ला यांच्यासोबत ठाम उभे आहोत. ते संस्थेच्या ‘सिनेट’ने मंजूर केलेल्या आणि सध्या अंमलात असलेल्या शैक्षणिक धोरणांनुसार आपली कर्तव्ये पार पाडत होते. या अभ्यासक्रमाचे शिक्षक असलेले प्रा. सूर्यनारायण डूल्ला हे १८ सप्टेंबर २०२६ रोजी (शुक्रवारी) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या ‘मिड-सेमिस्टर’ परीक्षेदरम्यान पर्यवेक्षणाचे काम करत होते. त्यावेळी त्यांना एका विद्यार्थ्याकडून शैक्षणिक गैरप्रकार (म्हणजेच परीक्षेदरम्यान अनधिकृतपणे स्मार्टफोन जवळ बाळगणे आणि त्याचा वापर करणे) केला जात असल्याचे निदर्शनास आले. संस्थेने मंजूर केलेल्या कार्यपद्धतीचा भाग म्हणून, त्यांनी या प्रकरणातील पुढील कार्यवाहीसाठी ही घटना संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.’
