नाशिकरोड बसस्थानकात काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार असल्याने पुढील तीन महिन्यांसाठी बसस्थानक बंद राहणार आहे. त्यामुळे सिटीलिंक बससेवेच्या काही फेऱ्या, मार्ग आणि थांब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी याबाबत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष बसव्यवस्था करण्यात आली आहे. रात्री ९.४५ वाजता पंचवटी एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवरून विविध मार्गांच्या पाच बसेस एकाच वेळी उपलब्ध असतील. तसेच रात्रीच्या वेळी रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी शहरात जाण्यासाठी पाच बसेस रात्रभर सुरू राहतील. यासह तपोवन ते सिन्नर मार्ग क्रमांक १४६ वरील बस बिटको चौकापासून नाशिकरोड पोलिस ठाणे, विभागीय आयुक्त कार्यालय टी-पॉइंट, उड्डाणपूल अप रॅम्पवरून सिन्नर फाटामार्गे जाईल.
Bribe Cases: ‘खाकी’त फोफावली खाबूगिरी; महसूल विभागात सर्वाधिक संशयित, राज्यात 3 कोटी तीन लाखांची लाचखोरी उघडपरतीच्या वेळी बस सिन्नर फाटा, मारुती मंदिर, उड्डाणपूल डाउन रॅम्प, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिटको चौक आणि दत्त मंदिर चौकमार्गे पुढे जाईल. दरम्यान, शहरातील इतर मार्गांवरील बसेस नाशिकरोड सिटीलिंक बस आगारातून सुटून सिन्नर फाटा, उड्डाणपूल डाउन रॅम्प, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिटको चौक व दत्त मंदिर चौकामार्गे शहरात जातील. शहरातून परतताना या बसेस दत्त मंदिर चौकातून सरळ उड्डाणपुलावरून सिन्नर फाटा आणि पुढे सिटीलिंक आगारात जातील. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Nashik FDA Action: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई! 48.81 लाखांचा अन्नसाठा जप्त, फ्राईड ओनियन, खाद्यतेलाचा समावेशबदलांनाही मुदतवाढ
निमाणीत काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने तेथील बसफेऱ्या मेळा, नवीन सीबीएस (ठक्कर बाजार) व महामार्ग बसस्थानकावर स्थलांतरित केल्या आहेत. द्वारका चौकातील मार्ग खुले झाल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी पुढील तीन महिने वाहतूक मार्गातील बदलांना मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसेस निमाणी-नांदूरनाका, धुळे – जळगावकडे जाणाऱ्या बसेस मेळा येथून, तर द्वारका – आडगावकडे, तर पुणे, शिर्डी व अहिल्यानगरच्या बसेस मेळा स्थानकातून मुंबई नाका, सिन्नर फाटामार्गे धावतील.
काम : काँक्रिटीकरण
कालावधी : २१ सप्टेंबर ते २० डिसेंबर २०२६
परिणाम : बसस्थानक तीन महिने बंद
बदल : सिटीलिंकच्या काही फेऱ्या, मार्ग व थांबे बदलले
त्र्यंबकेश्वर बस : मार्ग क्र. २४५, १४५ रेल्वे स्टेशनवरून
दिंडोरी बस : मार्ग क्र. २१० रेल्वे स्टेशनवरून
