• Fri. Mar 6th, 2026
    आठवीतील सहा विद्यार्थिनींशी गैरवर्तन, नामांकित शाळेतील शिक्षकाला अटक, एकट्यात गाठून बालिकांशी अश्लील चाळे

    Chandrapur Crime : वर्गात शिकवताना मुलींकडे अत्यंत वाईट नजरेने बघायचा, तसंच शाबासकी देण्याच्या नावावर शरीराला अश्लील स्पर्श करायचा, असा आरोप आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : शहरातील एका नामांकित शाळेत एका वर्गशिक्षकाने आठव्या वर्गातील सहा विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. गोवर्धन गोंडाणे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

    काय आहे प्रकरण?

    शाळेतील शिक्षक वर्गातील विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळालेली होती. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तातडीने शाहनिशा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने साध्या वेशात शाळेत जाऊन चौकशी केली. प्राथमिक तपासात तथ्य आढळताच महिला व बालविकास विभागाने विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी सहा मुलींनी या शिक्षकाच्या कृत्यांचा पाढाच वाचला. त्यावरून त्याला अटक केली.
    Maharashtra TimesUP Crime : 33 लहान मुलांवर अत्याचार, सिंचन विभाग इंजिनिअरसह पत्नीला मृत्युदंडाची शिक्षा, विकृती पाहून कोर्टाचा संताप

    पीडित मुलींनी काय सांगितलं?

    आरोपी गोवर्धन गोंडाणे हा मागील अनेक वर्षांपासून याच शाळेत कार्यरत होता. तो वर्गात शिकवताना मुलींकडे अत्यंत वाईट नजरेने बघायचा. शाबासकी देण्याच्या नावावर शरीराला अश्लील स्पर्श करणे, मांडीला हात लावणे आणि संगणक लॅबमध्ये एकट्या विद्यार्थिनीला बोलावून अश्लील चाळे करणे, असे कृत्य करत होता असे पीडित मुलींनी तक्रारीत म्हटले आहे.

    सदर शिक्षक अनेक वर्षांपासून याच शाळेत असल्याने, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर विद्यार्थिनींची छेड काढली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोपी शिक्षक गोवर्धन गोंडाणे याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
    Maharashtra TimesPune News : मळणीयंत्रात केस अडकले, पुण्यात महिलेचा हृदयद्रावक अंत, वाढदिवशीच मृत्यूने गाठलं

    पेयात गुंगीचे औषध मिसळून अत्याचार

    दुसरीकडे, अमरावतीत एका कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या गेट-टुगेदर पार्टीत एका विद्यार्थिनीला पेयात गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध करत तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून त्यांनी युवतीला सात-आठ महिने ब्लॅकमेल केल्याचाही आरोप आहे. चेतन गणेश अंबाडकर आणि आकाश गणेश अंबाडकर (दोघेही रा. निर्मला कॉलनी, बडनेरा) अशी आरोपींची नावे असून ही घटना २६ मे २०२५ रोजी रहाटगाव येथील हॉटेलमध्ये घडल्याचा आरोप आहे.

    Raj Thackeray | न पाहिलेली मुंबई पाहिली, शेतकरी पत्नींनी साधला राज ठाकरेंशी संवाद

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा