उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक शब्दांत सुनावले आहे. पंतप्रधान मोदी हे सगळ्यात मोठे कॉमेडीयन असल्याचा उल्लेख राऊत यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना ‘पप्पू’ ठरवलंय, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली. तर अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना डॉक्टरांना दाखवलं पाहिजे, असा टोला देखील त्यांनी लगावला.