• Mon. Sep 21st, 2026

Noise Pollution: डीजे कमी तरी नागरिकांना त्रास? विसर्जन मिरवणुकीत मध्यरात्री आवाजाने गाठला उच्चांक

Noise Pollution: ठाण्यात गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे कमी असला तरी ढोल ताशा आणि धातूच्या टोल वाद्यांच्या आवाजाने उच्चांक गाठला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.खास प्रतिनिधी,ठाणे :ठाण्यातील विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर कमी असला, तरी त्याची जागा आता मोठ्या ढोल-ताशांसह ध्वनिवर्धक आणि मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या धातूच्या टोल वाद्यांनी घेतल्याचे चित्र शनिवारी गौरी-गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये दिसून आले.

गौरी-गणपती विसर्जन

१९ सप्टेंबर रोजी झालेल्या घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते व जनहित याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केलेल्या ध्वनिपातळीच्या निरीक्षणात ध्वनिपातळी १०५ डेसिबलपर्यंत पोहोचली होती. विशेष म्हणजे, दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी नोंदवलेल्या १०० डेसिबलच्या कमाल पातळीच्या तुलनेत यावेळी ध्वनिपातळी १०५ डेसिबलपर्यंत वाढल्याचे दिसून आले.

ध्वनिपातळी

ठाण्यातील राम मारुती रोडवर रात्री ९.३० वाजता ८५ ते ९० डेसिबल ध्वनिपातळी नोंदविण्यात आली. या मार्गावर अनेक मिरवणुका एकाच वेळी सुरू होत्या. बहुतांश मिरवणुकांमध्ये ढोल-ताशे आणि बॅन्जो होते, तर सुमारे निम्म्या मिरवणुकांमध्ये स्पीकर्स, साउंड सिस्टीम वापरल्या जात होत्या.

आवाजाची सरासरी पातळी

या परिसरातील आवाजाची सरासरी पातळी ८५ ते ९५ डेसिबल असल्याचे निरीक्षणात नमूद करण्यात आले. पाचपाखाडी रोडवर रात्री १० वाजता ९० ते ९५ डेसिबल, तर टीएमसी सर्कल येथे रात्री १०.३० वाजता ९० ते ९५ डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली.

फटाक्यांचाही वापर केल्याचे नमूद

गौरी-गणपती विसर्जनाच्या निरीक्षणात बॉलिवूड गाण्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, डीजेची जागा मोठ्या संख्येने ढोल, साउंड सिस्टीमआणि टोल वाद्यांनी घेतल्याने एकत्रित आवाजाची तीव्रता कमी झालेली नसल्याचे निरीक्षणातून दिसते. काही मिरवणुकांमध्ये फटाक्यांचाही वापर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra TimesBMW Car Crash : कोस्टल रोडवरुन BMW उडून पडली, प्राण सोडले तरी शनयचा पाय ॲक्सिलरेटरवरच, एक मित्र 20 फूट दूर फेकला गेला, अपघाताचा थरार समोर

कर्णकर्कश आवाज कायम

डॉ. बेडेकर यांच्या निरीक्षणानुसार, मागील वर्षांच्या तुलनेत ध्वनिपातळीत कोणतीही घट झालेली दिसून आली नाही. उलट, डीजेचा वापर कमी होत असताना अनेक ढोल आणि नव्या धातूच्या वाद्यांमुळे कर्णकर्कश आवाज कायम राहिला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये कानठळ्या बसवणारा अनुभव येत असून अनेकांना त्यामुळे गंभीर त्रास झाल्याची शक्यता डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा