Farmer News: दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याचे समोर येताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. एकाच कुटुंबातील दोन भावांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गावात शोककळा पसरली.
संकट पाहिलं, दोन्ही भावांनी मंदिराचा आसरा घेतला, पण मृत्यूने तिथेही गाठलं(फोटो– Lipi)
नागपूर : पावसापासून बचावासाठी शेतातील मंदिराचा आसरा घेतला, मात्र याच मंदिर परिसरात वीज कोसळल्याने दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील तिष्टी खुर्द शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही भाऊ घरी न परतल्याने सुरू झालेल्या शोधाशोधीनंतर ही घटना उघडकीस आली. टिबुराज राजेराम कानफाडे (६४) आणि लक्ष्मण घनश्याम कानफाडे (५३), अशी मृतकांची नावे आहेत. दोघेही तिष्टी खुर्द येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करीत होते. दोन्ही भाऊ कष्टाळू शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. टिबुराज हे शेतीसोबतच पोलिस दलात होमगार्ड म्हणूनही काम करत होते.
शनिवारी दोन्ही भाऊ नेहमीप्रमाणे आपापली बैलजोडी, गायी आणि इतर जनावरे घेऊन तिष्टी खुर्द शिवारातील शेतात गेले होते. दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास शिवारात अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढत असतानाच विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी दोन्ही भावांनी शेतातील मातामाय मंदिराचा आसरा घेतला. मात्र, मंदिर परिसरातच जोरदार वीज कोसळली. या दुर्घटनेत दोन्ही भाऊ होरपळून गंभीर जखमी झाले आणि काही वेळातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. शिवारात त्यावेळी अन्य कोणीही नसल्याने दोघांना वेळीच मदत मिळू शकली नाही. त्यामुळे मदत पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला असावा, मंदिराजवळील कडुनिंबाच्या झाडावरही वीज कोसळल्याचे निशाण आढळून आले. त्यामुळे वीज पडल्यानेच दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, सायंकाळ उलटून गेल्यानंतरही दोन्ही भाऊ जनावरांसह घरी परतले नाहीत. रात्री ८ वाजेपर्यंत ते घरी न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी स्थानिकांच्या मदतीने दोन्ही भावांचा शिवारात शोध सुरू केला. शोध घेत असताना रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास राजू आसोले यांच्या शेताजवळ काही जनावरे फिरताना आढळून आली. त्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी परिसरात बारकाईने पाहणी सुरू केली. यावेळी तिष्टी खुर्द शिवारातील मातामाय मंदिराच्या परिसरात दोन्ही भाऊ मृतावस्थेत पडलेले दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच मोहपा पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी मोहपा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, ठाणेदार ईश्वर हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या घटनेने तिष्टी खुर्दसह परिसरातील शेतकरी हळहळले आहेत. जनावरांना घेऊन शेतात गेलेल्या दोन्ही भावांनी पावसापासून बचावासाठी मंदिराचा आधार घेतला, मात्र त्याच ठिकाणी वीज कोसळल्याने त्यांचा जीव गेला. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा