• Mon. Sep 21st, 2026

Dr Manisha Jejurkar Death Case : नाशिकमधील डॉ. मनीषा जेजुरकर यांना जीव देण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात पती डॉ. निलेश याच्यानंतर सहकारी डॉ. स्वाती चव्हाण हिला अटक करण्यात आली आहे. डॉ. निलेश आणि डॉ. स्वाती यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा मुद्दा तपासात समोर आला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाचा प्रमुख डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर याला पत्नी डॉ. मनीषा जेजुरकर यांना जीव देण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अखेर अटक करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ डॉ. निलेशची सहकारी डॉ. स्वाती चव्हाण हिला अटक करण्यात आली आहे. डॉ. निलेश आणि डॉ. स्वाती यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा आणि मुद्दा तपासात समोर आला आहे.

बहिणीच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा

६ मार्च २०२६ रोजी नाशिकमधील गंगापूर रोडवरील डी. के. नगर परिसरातील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये डॉ. मनीषा नीलेश जेजुरकर (वय ४०) यांनी गळफास घेत आयुष्याची अखेर केली होती. त्यांची बहीण रोहिणी वैभव थोरात यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. नीलेशविरुद्ध जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा गंगापूर पोलिसांत नोंद करण्यात आला आहे.

Maharashtra TimesSahil Wakode : विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, कुटुंबाचा प्राध्यापकावर जातीय भेदभावाचा आरोप, IIT मुंबईकडून प्रोफेसरची पाठराखण

सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांकडून अटक

१७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेदेखील नीलेशला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. त्यानुसार शुक्रवारी (दि. १८) दुपारी गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेत कसून चौकशीला सुरूवात केली. रात्री उशिरापर्यंत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू होती.

डॉ स्वाती चव्हाणशी विवाहबाह्य संबंध

दरम्यान, मनिषा यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर बरेच दिवस नीलेश जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर गैरहजर होता. मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्यावर तो सेवेत रूजू झाला होता. सन २०२१ पासून नीलेश हा पत्नी मनीषा यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा दावा केला जात होता. घरातील किरकोळ गोष्टींसह निर्णयाबाबत तो एका डॉक्टर महिलेचा सल्ला घेत होता. तिच्या सांगण्यांनुसार वागत असल्याने पती-पत्नीत कौटुंबिक विसंवाद वाढल्याचा आरोप झाला होता. ही महिला डॉ. स्वाती चव्हाण असल्याचे समोर येत आहे.

Maharashtra TimesElectric Shock : आम्ही गमावलेलं मूल परत येणारे का? गणरायाच्या दर्शनावेळी शॉक, चिमुरडीचा करुण अंत, नातेवाईकांचा उद्विग्न सवालनीलेशने पत्नीकडे दुर्लक्ष करून मानसिक त्रास दिला. सततचा मानसिक छळ आणि घरातील कलहामुळे मनीषा यांनी जीवन संपवल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मनिषांना स्वातीने फोनवरुन हिणवलं

दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये डॉक्टर स्वाती चव्हाण हिने डॉ. निलेशच्या पत्नीला फोन करून ‘तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस, तुझ्या बुद्धीची पातळी कमी आहे’, या शब्दांत हिणवून मानसिक त्रास दिला होता.

Maharashtra TimesBMW Car Crash : कोस्टल रोडवरुन BMW उडून पडली, प्राण सोडले तरी शनयचा पाय ॲक्सिलरेटरवरच, एक मित्र 20 फूट दूर फेकला गेला, अपघाताचा थरार समोर

जीव दिला नव्हे, घेतल्याचा संशय

घटनेच्या ठिकाणच्या फोटोनुसार, खिडकीला दोरी बांधलेली आढळली आहे. त्यामुळे अशा प्रकारे जीव देणे अशक्य वाटते. मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात झाले. तेथे नीलेश कार्यरत असून ‘पोस्ट-मॉर्टम’ अहवालात फेरफार झाल्याचा आणि ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आहे’, असा युक्तिवाद सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.