शहरातील १२२ पैकी १५ ठिकाणी ‘टाइट फाइट’ रंगत असून, दिग्गजांसमोर दिग्गजांनी आव्हान उभे केल्याने कोण कोणाचे पतंग कापतो याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून, ७३५ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. यात सर्वाधिक ३८ माजी नगरसेवक भाजपकडून रिंगणात असून, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आहे. शिंदे गटाकडून ३० माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात आहेत.
Nashik News: मोठी बातमी: मंत्री महाजनांना ‘अटकाव’ भोवला; सिडकोत राडा करणाऱ्या पिता-पुत्राविरोधात पोलिसांची मोठी कारवाई
१२२ पैकी ९६ ठिकाणी भाजप आणि शिंदेसेना यांच्यात थेट लढत होत आहे. निवडणुकीसाठी ७३५ उमेदवार रिंगणात असले, तरी ८७ माजी नगरसेवकांच्या लढतींकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. त्यात सहा माजी नगरसेवक अपक्ष म्हणून मतदारांसमोर गेले आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आदी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह जवळपास २०८ अपक्ष उमेदवारदेखील निवडणुकीच्या आखाड्यात नशीब आजमावत आहेत.
नाशिकमध्ये भाजप स्वबळावर, तर शिवसेना-राष्ट्रवादी, रिपब्लिकन सेना युती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये ‘फाइट’ होत आहे. शहरातील १२२ जागांपैकी १५ जागांवरील लढती लक्षवेधी बनल्या आहेत. त्यात प्रभाग क्रमांक १, ३, ५, ७, १२, १३, १५, १६, १७, २०, २४, २५, २९, ३० या पंधरा लढतींमध्ये महापालिकेतील प्रमुख पदाधिकारीच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या लढतींत कोण बाजी मारणार याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
Rohan Deshpande : मनसे-ठाकरेंसोबत आंदोलन, ‘कमळा’ची बदनामी, भाजपच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी
तिरंगी, बहुरंगी लढती
नाशिक महापालिकेची निवडणूक भाजपने यंदा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण १२२ पैकी ११८ जागांवर थेट उमेदवार देत भाजपने ताकद दाखविली आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्र येऊन स्वतंत्र युती केली. दुसरीकडे शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि मनसे यांनी भाजपविरोधात वेगवेगळ्या पातळ्यांवर लढत उभी केली. परिणामी ही निवडणूक तिरंगी, चौरंगी आणि अधिकच चुरशीची बनली आहे.
तीन माजी महापौरांचीही परीक्षा
महापालिकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांकडून ४४ माजी नगरसेविका निवडणूक लढवत आहे. याशिवाय रंजना भानसी, नयना घोलप व अशोक मुर्तडक हे तीन माजी महापौरदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी महापौर अशोक दिवे यांचे पुत्र राहुल दिवे, वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते, सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या कुलकर्णी, अॅड. यतिन वाघ यांची पत्नी हितेश वाघ, विनायक पांडे यांची स्नुषा आदिती पांडे हेदेखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यापैकी दिवे आणि गिते हे दुसऱ्यांदा निवडणुकीत नशीब आजमवणार आहेत. सोबतच माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटीलदेखील निवडणूक रिंगणात असून, या माजी महापौरांच्या कुटुंबीयांच्या लढतींकडेही शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पाडू हे नवीन मशिन का आणलं? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल
..या प्रभागांत ‘टाइट फाइट’
प्रभाग १ अरुण पवार (भाजप) विरुद्ध प्रवीण जाधव (शिंदेसेना)
प्रभाग ३: प्रियंका माने (भाजप) विरुद्ध पूनम मोगरे (शिंदेसेना)
प्रभाग ५ गुरुतिम बग्गा (भाजप) विरुद्ध अशोक मुर्तडक (अपक्ष)
प्रभाग ७: योगेश हिरे (भाजप) विरुद्ध अजय बोरस्ते (शिंदेसेना)
प्रभाग १२: शिवाजी गांगुर्डे (भाजप) विरुद्ध समीर कांबळे (शिंदेसेना)
प्रभाग १२ : डॉ. हेमलता पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट) विरुद्ध नूपुर सावजी (भाजप)
प्रभाग १३ : शाहू खैरे (भाजप) विरुद्ध गणेश मोरे (शिंदेसेना)
प्रभाग १५: मिलिंद भालेराव (भाजप) विरुद्ध प्रथमेश गिते (उबाठा)
प्रभाग १६ : राहुल दिवे (शिंदेसेना) विरुद्ध कुणाल वाघ (भाजप)
प्रभाग १७: दिनकर आढाव (भाजप) विरुद्ध राजेश आढाव ( शिंदेसेना)
प्रभाग २० : संभाजी मोरुस्कर (भाजप) विरुद्ध कैलास मुदलीयार (शिंदेसेना)
प्रभाग २४: कैलास चुंभळे (भाजप) विरुद्ध प्रवीण तिदमे (शिंदेसेना)
प्रभाग २५ सुधाकर बडगुजर (भाजप) विरुद्ध अॅड. अतुल सानप (शिंदेसेना)
प्रभाग २९ : दीपक बडगुजर (भाजप) विरुद्ध मुकेश शहाणे (अपक्ष)
प्रभाग ३०: अजिंक्य साने (भाजप) विरुद्ध सतीश सोनवणे (राष्ट्रवादी)
