• Mon. Mar 16th, 2026

    Bandra Terminus: वांद्रे टर्मिनसवर मोठी अपग्रेड! तीन नव्या मार्गिकांमुळे लोकलची संख्या वाढणार; काय आहेत नवे बदल?

    Bandra Terminus: वांद्रे टर्मिनसवर मोठी अपग्रेड! तीन नव्या मार्गिकांमुळे लोकलची संख्या वाढणार; काय आहेत नवे बदल?

    Western railway: वांद्रे टर्मिनसवर गेल्या काही वर्षांपासून मोठे बदल करायचे काम सुरू होतं. आता हे काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे या मार्गावर तीन नवीन मार्गिका तयार झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांना काय-काय फायदे होतील, हे पाहा…

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसमधील लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांच्या देखभाल क्षमतेत वाढ झाली आहे. इथे तीन नव्या देखभाल मार्गिका उपलब्ध झाल्याने रेल्वेगाड्या उभ्या करण्याचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला असून, यामुळे वाढीव रेल्वेगाड्या चालवण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.

    कोणत्या स्थानकांवर नव्या मार्गिका?

    रेल्वे टर्मिनसमधील क्षमता वाढवण्यासाठी मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथे नव्या मार्गिका उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर वापरात असलेल्या मार्गावरील फलाटांची लांबीदेखील वाढवण्याचे काम सुरू आहे. जोगेश्वरी, वसई रोड येथे नवे टर्मिनस उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. वांद्रे टर्मिनसमध्ये तीन देखभाल मार्गिका होत्या. प्रवासी गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता तीन नव्या मार्गिका उभारण्यात आल्या आहेत. त्यांवर रेल्वेगाड्या धुण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे.Maharashtra TimesWestern Railway: नवीन वर्षात मुंबईतील रेल्वे प्रवाशांना खास भेट, राजधानी- शताब्दीला मिळणार अतिरिक्त AC कोच; किती नवे डबे जोडणार?

    काय आहेत वैशिष्ट्ये?

    या मार्गिकांची लांबी 540 मीटर असून, त्या 24 डब्यांच्या प्रवासी गाड्यांसाठी उपयुक्त आहेत. एलएचबी अर्थात लिंके हॉफमन बुश आणि आयसीएफ बनावटीसह अन्य सर्व प्रकारच्या डब्यांच्या देखभालीची व्यवस्था येथे असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले. वांद्रे टर्मिनसमधील कोचिंग डेपोत सुमारे 800 डब्यांची देखभाल केली जाते. एलएचबी डब्यांची देखभाल दर 36 महिन्यांनी आणि आयसीएफ डब्यांची देखभाल 18 महिन्यांनी केली जाते.

    53 कोटींचा खर्च

    या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण 53 कोटींचा खर्च झाला आहे. हे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. नव्या मार्गिकांपैकी पहिली मार्गिका जुलै 2024मध्ये वापरात आली होती. उर्वरित दोन मार्गिकांचे काम डिसेंबर 2025 मध्ये पूर्ण झालं होतं. यासाठी एकूण 53 कोटी 76 लाखांचा खर्च आला होता. या नव्या तीन मार्गिकांमुळे अतिरिक्त नभ रेल्वेगाड्यांची हताळणी शक्य होणार आहे.

    Maharashtra TimesSiddhivinayak Temple Closed: भाविकांनो, सिद्धिविनायक दर्शनाला जाताय? ही बातमी एकदा वाचा, मंदिरात 5 दिवस दर्शन बंद; कारण काय आणि कधी?

    राज्याला मिळणार हँडहेल्ड एक्सरे यंत्रे

    दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी आणि रुणकेंद्रीत सेवा देणे यांबाबत त्यांच्यात सविस्तर चर्चा झाली. राज्यातील क्षयरुग्णांची एक्सरे तपासणी वाढविण्याची सूचना केंद्राने केली असून, केंद्राकडून लवकरच राज्याला ९६ अतिरिक्त हँडहेल्ड एक्सरे मशिन देण्यात येणार असल्याची माहिती आबिटकर यांनी या भेटीनंतर दिली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा