Narayan Rane hints at Political Retirement : ‘कोकणात नारायण राणेंना संपवण्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना कधी यश आले नाही.’ असेही ते म्हणाले.
‘नीलेश व नितेश या दोघांचेही काम चांगले आहे. मला मुख्यमंत्री भेटले तेव्हा सांगितले दोघांचेही चांगले काम आहे, हे ऐकून मला अभिमान वाटला. त्या दोघांना तुम्ही आशीर्वाद द्या,’ असे आवाहन नारायण राणे यांनी केले. ‘द्वेषाच्या राजकारणाला कधीही थारा देऊ नका,’ असेही ते म्हणाले.
‘कोकणात राणेंना संपवण्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. येथील नागरिकांची आशीर्वाद आहेत. त्यामुळे राणेंना संपवणे कोणालाही शक्य झाले नाही,’ असेही त्यांनी नमूद केले. यावेळी मंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे उपस्थित होते. नगर परिषद निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांचे महत्त्व कमी करण्याचा झालेला प्रयत्न, त्यानंतर जिल्ह्यात झालेला राणे बंधूंचा विजय याबाबत नारायण राणे बोलत होते.
Nashik News : भाजप नेत्याने बंडखोराला अर्जमाघारीला नेलं, पण पाच मिनिटांनी खेळ फिरला, प्रवेशद्वारातच काय नाट्य घडलं?
‘सन १९९०मध्ये मी कोकणात आलो. येथील नागरिकांच्या आशीर्वादामुळे आमदार झालो. तेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजवर रस्ते, पाणी, धरणे, पूल अशी अनेक लोकहिताची, विकासाची काम केली. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा भाग समृद्ध आहे. येथील विकास यालाच आपण कायम महत्त्व दिले,’ असे राणे म्हणाले.
Sayali Wanjale : ‘गोल्डमॅन’ रमेश वांजळेंची लेक पुण्यातील सर्वात श्रीमंत महिला उमेदवार, सायली वांजळेंची संपत्ती ७७ कोटी, सोनं किती?
‘कणकवलीत आलो तेव्हा जिल्ह्यातील गरिबी नष्ट करेन अशी शपथ घेतली. लोकांच्या आशीर्वादाने आमदार झालो. आजवर सगळ्यात मोठी १० पदे राजकारणात पूर्ण केली. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यामुळे आजही सक्रिय आहे,’ असेही त्यांनी सांगितले. ‘मी समर्थ आहे, वय कितीही झाले, तरी मागे पाहत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काही उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. आमचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग समृद्ध करणे हे ध्येय आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी महायुती आहे. सगळ्यांनी एकत्र हा काम करा,’ असेही त्यांनी अधोरेखित केले.
Narayan Rane: कणकवलीतून केंद्रीय मंत्री नारायण राणेंची सभा लाइव्ह
