Munbai Bandra Coastal Road Accident News : वांद्रे कोस्टल रोडवर ओव्हरटेक करण्याच्या नादात घडलेल्या या भीषण अपघातात 20 वर्षीय स्विगी डिलिव्हरी बॉयचा रक्ताच्या थारोळ्यात पडून करुण अंत झाला.
मुंबई स्विगी डिलिव्हरी बॉय अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दक्षिण मुंबईतील एका बिझनेसमॅनच्या मुलानं दामटवलेल्या भरधाव अलिशान SUV कारने बाईकला मागून जोरदार धडक दिली. वांद्रे कोस्टल रोडवर ओव्हरटेक करण्याच्या नादात घडलेल्या या भीषण अपघातात 20 वर्षीय स्विगी डिलिव्हरी बॉयचा रक्ताच्या थारोळ्यात पडून करुण अंत झाला. अवघ्या एका पार्सल डिलिव्हरीसाठी घराबाहेर पडलेला शुभमच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमका कसा झाला अपघात?
मुंबईतील बांद्रा-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी रात्री एक भीषण अपघात घडला. ओव्हरटेक करण्याच्या नादात सुमारे 2.5 कोटी रुपये किमतीच्या एका अलिशान लक्झरी SUV कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात 20 वर्षीय स्विगी डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झाल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
Baramati Accident : बारामतीहून दहीहंडीसाठी पुण्यात निघाले, नियंत्रण सुटल्याने बाईक घसरली, खाली पडताच भरधाव वाहनाने उडवलं; तरुणाचा जागीच अंत
खिशातील ओळखपत्रावरून ओळख पटली
शुभम प्रजापती (वय 20) असं मृत डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. शुक्रवारी रात्री 10.15च्या सुमारास शुभम आपल्या दुचाकीवरून पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांच्या गस्ती पथकानं त्याला तातडीने भाभा रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री 12.12 वाजता त्याची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी त्याच्या खिशातील ओळखपत्रावरून त्याची ओळख पटवून कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली.
काळ्या रंगाची लक्झरी SUV
या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी राजस्थान पासिंग असणाऱ्या काळ्या रंगाच्या लक्झरी SUVचा चालक युवराज बाहेती (वय 28) याला अटक केली आहे. ही अलिशान कार महालक्ष्मी येथील एका आयात-निर्यात बिझनेसमॅनच्या मुलाची असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्यावेळी आरोपी ड्रंक अँड ड्राईव्ह (मद्यधुंद) स्थितीत नव्हता. तो खार येथून महालक्ष्मी येथील आपल्या घरी जात असताना हा अपघात घडला. बाहेती याने पळून न जाता घटनास्थळीच थांबून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला काल शनिवारी न्यायालयात हजर केलं असता त्याला जामीन मंजूर झाला आहे. पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी (BNS आणि मोटर व्हेईकल ॲक्टनुसार) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा