Maharashtra Live News: राज्यात थंडीचा कडाका वाढला असून उत्तर भारतात तीव्र शीतलहर जाणवत आहे. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याने निवडणुकीतील समीकरणे बदलली आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. दरम्यान, पुण्यात मनसेच्या भूमिकेवर संभ्रम असून अवघ्या दोन दिवसांत तीन वेळा यु-टर्न घेतल्याचं चित्र आहे.
दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स पाहा फक्त एका क्लिकवर
