• Sun. Aug 2nd, 2026
    Pune Crime : नोकरी गेल्यानंतर आर्थिक अडचण, राहतं घरही गेलं, पुण्यात कुटुंबाचा टोकाचा निर्णय, वडिलांचा करुण अंत; घरात धक्कादायक गोष्टी सापडल्या

    Pune Crime News : सध्या संत तुकाराम नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. माय-लेकीची तब्येत बरी झाल्यानंतर, कुटुंबाने हे पाऊल का उचललं याबाबत अधिकचा उलघडा होईल.

    पिंपरी मोरवाडी पिल्लाई कुटुंब आत्महत्येचा प्रयत्न(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरातून एक मन अत्यंत सुन्न करणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गंभीर आर्थिक संकटाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी जीवन संपवण्याचा भयंकर मार्ग अवलंबला आहे. या दुर्दैवी घटनेत कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा दुर्दैवी अंत झाला असून, त्यांची पत्नी आणि मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. विनोद पिल्लाई (वय 50), सिल्जा पिल्लाई (वय 45) आणि पूर्णिमा पिल्लाई (वय 19, सर्व रा. करिष्मा ग्लोरी सोसायटी, मोरवाडी, पिंपरी; मूळ रा. केरळ) अशी त्यांची नावे आहेत. यापैकी उच्चशिक्षित विनोद पिल्लाई यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी सिल्जा आणि महाविद्यालयीन मुलगी पूर्णिमा यांच्यावर वायसीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

    तपासात काय समोर आलं?

    तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये विनोद यांची नोकरी सुटल्यानंतर कुटुंबाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली होती. वाढत्या अडचणींमुळे त्यांनी पिंपरीतील नेहरूनगर येथील स्वतःचं घर विकलं आणि मोरवाडी परिसरात भाड्याने राहण्यास आले. त्यातच मूळ गावी घराचं बांधकाम सुरू असल्यानं त्यांच्यावरील आर्थिक ताण अधिकच वाढला होता. या सततच्या विवंचनेला कंटाळून त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री घरात कोळसा पेटवून त्यावर ‘सोडियम नायट्रेट’ हे प्राणघातक रसायन टाकलं. यामुळे निर्माण झालेल्या विषारी धुरामुळे तिघेही घरातच बेशुद्ध पडले. काल शनिवारी सकाळी एका खासगी शाळेत समन्वयक असणाऱ्या सिल्जा पिल्लाई या नेहमीप्रमाणे शाळेत न पोहोचल्यानं त्यांच्या सहकाऱ्यांनी विचारपूस सुरू केली.
    Maharashtra TimesPune Crime : नुकतंच लग्न, तरीही फ्लॅटमध्ये एकटेच, पत्नीसोबत वाद अन् घटस्फोटाची चर्चा, पुण्यातील ॲमनोरा टाऊनशिपमध्ये धक्कादायक घडलं

    ‘यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये’

    सोसायटीतील नागरिकांनी पाहणी केली असता घरातील भयानक प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांच्या मदतीने सर्वांना रुग्णालयात दाखल केलं, परंतु विनोद यांचा आधीच मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट जप्त केली आहे, ज्यामध्ये ‘आम्ही आर्थिक अडचणींमुळे स्वतःहून हे पाऊल उचलत असून, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा स्पष्ट उल्लेख आहे.
    Maharashtra TimesJalgaon Crime : गाढ झोपलेल्या पोटच्या चिमुकल्यांवर जीवघेणा हल्ला, लेकीचा झोपेतच अंत; मुलगा गंभीर जखमी, जन्मदात्याचं संतापजनक कृत्य

    घरातून सोडियम नायट्रेटचा डबा जप्त

    सध्या संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सोडियम नायट्रेटचा डबा, कुरिअरचे पाकीट, कोळसा आणि राख जप्त केली आहे. विनोद यांनी हे रसायन ऑनलाईन मागवलं होतं. विषारी धूर कसा तयार करायचा, याचा शोध त्यांनी इंटरनेटवर घेतला होता का, तसेच तिघांच्याही मोबाईल फोनची डिजिटल तपासणी करून ऑनलाईन व्यवहार आणि कर्जाची माहिती पोलीस गोळा करत आहेत. माय-लेकीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर या घटनेमागील अधिक तपशील समोर येऊ शकेल.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा