Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात एका जन्मदात्या बापाने स्वतःच्या दोन निष्पाप लेकरांवर झोपेत असताना जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चोपडा वडिलांनी झोपेत पोटच्या मुलांवर जीवघेणा हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : बाप की कसाई? असा थरकाप उडवणारा प्रश्न निर्माण करणारी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना आज रविवारी वडती (ता. चोपडा, जि. जळगाव) येथे उघडकीस आली आहे. एका जन्मदात्या बापानेच मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या आपल्या दोन निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या रक्ताळलेल्या थरारात 13 वर्षीय चिमुरडीचा जागीच करुण अंत झाला, तर 11 वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाला आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
बहीण-भावावर काळाचा घाला
दोन्ही भावंडे रात्री घरात गाढ झोपलेली होती. त्यांना कल्पनाही नव्हती की ज्या बापाच्या छत्राखाली ते सुरक्षित आहेत, तोच त्यांचा काळ बनणार आहे. संशयित नराधम बाप सुभाष गोपाळ भिलाला (वय 50) याने रात्रीच्या अंधारात कुऱ्हाड हातात घेऊन झोपलेल्या मुलांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. कुऱ्हाडीचे घाव इतके वर्मी होते की, चिमुकल्या मुलीचा तडफडून जागीच मृत्यू झाला. तर तिचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला असून सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. Pune Crime : नुकतंच लग्न, तरीही फ्लॅटमध्ये एकटेच, पत्नीसोबत वाद अन् घटस्फोटाची चर्चा, पुण्यातील ॲमनोरा टाऊनशिपमध्ये धक्कादायक घडलं
थरारानंतर आरोपी जंगलात फरार
ही हत्या करुन आरोपी सुभाष भिलाला याने घटनास्थळावरून जवळच असलेल्या घनदाट जंगलाच्या दिशेने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याच्या पथकाने वादळासारखी चक्रे फिरवली. जंगलाची वेढाबंदी करत पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली आणि काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या. Tukaram Mundhe : चिक्कीचं पॅकेट घेतलं, उघडताच धक्कादायक दृश्य, जिवंत अळ्या हातावर; तुकाराम मुंढे काय कारवाई करणार?
हल्ल्याचे गूढ कायम
या अमानुष आणि क्रूर कृत्यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घरगुती वाद, अंधश्रद्धा, की आरोपीची मानसिक स्थिती खालावली होती? या सर्व बाजूंनी अडावद पोलीस संशयिताची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेली कुऱ्हाड जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वडती गावावर शोककळा पसरली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा