IMD Rain Alert: पोषक वातावरण नसल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.
हवामान अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी जोरदार बरसलेल्या पावसाने शनिवारी विश्रांती घेतली. दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. पुढील दोन दिवस शहरात हलक्या सरी, तर रविवारी घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
बंगालच्या उपसागराकडून छत्तीसगड, विदर्भावरील कमी दाबाचे क्षेत्र आता विरळ झाल्याने शनिवारी सर्वच ठिकाणी पावसाचा जोर ओसरला. पुण्यामध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत कोवळे ऊन पडले होते; पण दहानंतर पुन्हा ढग दाटून आले आणि अकराच्या सुमारास काही वेळ सर्वदूर हलक्या सरी पडल्या. दुपारी वारेही सुटले होते. त्यामुळे हवेत गारवा जाणवला. पाऊस थांबल्यामुळे पुणेकर संध्याकाळी कामासाठी बाहेर पडले होते. अनेकांना शनिवारी सुट्टी असल्याने मध्यवर्ती पुण्यात आणि बाजारपेठांमध्ये चारनंतर गर्दीही झाली. रात्री आठनंतर काही भागांत पुन्हा पाऊस सुरू झाला.
दोन दिवसांच्या तुलनेत कमाल तापमानात थोडी वाढ होऊन दिवसभरात कमाल २८.६ आणि किमान २३.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदांज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. पुण्याबरोबरच राज्यातील बहुतांश भागात पुढील आठवड्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.
पाण्याची चिंता मिटली
‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदाचा कमी पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर ‘पुढे काय होणार’ अशा चिंतेत असलेल्या पुणेकरांना जुलै महिन्यातील पावसाने दिलासा दिला आहे. पुणे शहाला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात महिनाभरापूर्वी अवघा ३.६६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी असताना जुलैतील जोरदार पावसामुळे पाणीसाठा २५ टीएमसीने वाढला आहे. सद्यस्थितीत प्रकल्पातील धरणे जवळपास भरली असून, धरणांत एकूण २८.६१ टीएमसी म्हणजेच ९८ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांपैकी एक जुलैला टेमघर धरण रिकामे होते, तर खडकवासल्यात अर्धा टीएमसीपेक्षा कमी पाणी होते. मात्र, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातील पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खडकवासला धरण पहिल्यांदा शंभर टक्के भरले, तर आता दुसऱ्यांदा हे धरण भरले आहे. खडकवासला आणि वरसगाव ही दोन्ही धरणे शनिवारी १०० टक्के भरली आहेत. पाण्याची पातळी आणि सुरक्षितता राखण्यासाठी सहा टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणात २८ टीएमसीपेक्षा अधिक पाणी जमा झाल्याने वर्षभराची पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मिटल्याचे मानले जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा