Soham Chindarkar Death Case : आत्महत्या करण्यापूर्वी सोहमने आईच्या मोबाईलवरुन मुलीला मेसेज केल्याचं समोर आलं होतं. आता या घटनेत दोघांनी आत्महत्या का केली? याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तरंदळे तलावात दोघांची आत्महत्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात एका तरुणाने व एका मुलीने तरंदळे तलावात आत्महत्या केल्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना मंगळवार दि. 9 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली होती. मात्र, इतका टोकाचा निर्णय घेत या आत्महत्या मागचं नेमकं कारण समोर आलं नव्हतं. या घटनेतील तरुणाचा मोबाईल हरवल्यानं तो कोणाला सापडल्यास त्यामध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो आहेत. त्यामुळे माझी बदनामी होईल या भीतीने त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. गहाळ झालेला मोबाईलच या सगळ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याची माहिती समोर आली आहे.
Sindhudurg Crime : आपण तरंदळे धरणावर जाऊया, आईच्या फोनवरुन सोहमचा ‘तिला’ मेसेज, घरच्यांनी मोबाईल पाहिला, धावत पोहोचले तर दोघंही…
माझी बदनामी होईल
तरंदळे धरणावर उडी घेऊन जीवन संपवणाऱ्या कलमठ परिसरातील तरुण आणि मुलीनं आपलं जीवन संपवलं आहे. घरातून बाहेर पडण्यापूर्वी या युवकाने आपल्या आईच्या मोबाईलवरून त्याच्या खास मैत्रीणीला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला होता. त्यात ‘माझा मोबाईल हरवला आहे. त्यात काही आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ आहेत. मोबाईल कोणाला मिळाल्यास माझी बदनामी होईल, त्यामुळे मी माझं जीवन संपवत आहे’, असा मेसेज त्याने तिला पाठवला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.
Goa Night Club Fire : गोव्यातील नाईट क्लबमध्ये वेटरचं काम, आग लागल्यानं किचनमध्ये गुदमरुन मृत्यू, भावाच्या मृत्यूची बातमी कळताच…
‘तुझ्याशिवाय मी कशी जगू?
सोहमची ही मानसिक स्थिती पाहून मैत्रिणीने त्याला शांत करण्याचा प्रयत्नही केला. परंतु सोहम बदनामीच्या भीतीने घाबरला होता. तो काही ऐकण्यास तयार नसल्यानं त्याच्यावर जीव जडलेल्या मुलीनेही ‘तुझ्याशिवाय मी कशी जगू? आपण दोघांनी एकत्रच जीवन संपवूया’, असा संदेश पाठविल्याचं तपासात समोर आलं आहे. या मेसेज संभाषणात दोघांनी कोणत्या ठिकाणी भेटायचं हे निश्चित केलं होतं. याप्रमाणेच ते तरंदळे धरण परिसरात गेले व दोघांनीही आत्महत्या केली. तरुण आणि मुलीच्या घरच्यांवरही दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास कणकवली पोलीस करत आहेत.
