एमपीएससी पेपरफुटीविरोधात आक्रमक झालेले आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांची बाजू ठामपणे मांडत सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. नुकतेच लातूरमध्ये आयोजित केलेल्या विद्यार्थी आक्रोश मोर्चाला देखील रोहित पवार यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी रोहित पवारांसमोर भाषण करणाऱ्या अभय साळुंके यांच्या भाषणाची विशेष चर्चा रंगली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत साळुंकेंनी जोरदार भाषण केलं.