• Fri. Sep 11th, 2026

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची ‘सुयोग’ला भेट – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Dec 10, 2025
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची ‘सुयोग’ला भेट – महासंवाद




नागपूर, दि. 10 : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुयोग निवासस्थान येथे भेट देऊन पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.

प्रारंभी शिबीरप्रमुख प्रवीण पुरो यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन डॉ. गोऱ्हे यांचे स्वागत करण्यात आले. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सहशिबिरप्रमुख खंडुराज गायकवाड आदी उपस्थित होते.

विधिमंडळातील निर्णय, शासनाची वाटचाल, महिलांचे प्रश्न व ते सोडविण्यासाठी शासन स्तरावर होत असलेले प्रयत्न, कायदे व सुव्यवस्था अशा विविध बाबींविषयी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक वातावरणात मनमोकळेपणे संवाद साधला. यावेळी शिबिराचे सदस्य मिलींद लिमये यांच्या वाढदिवसानिमित्त उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.

0000

 







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed