मध्य रेल्वेवर गर्दी कमी करण्यासाठी 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार आहेत. यासाठी 34 स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे दररोज सुमारे 3 लाख अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक शक्य होईल आणि रेल्वेचा खोळंबा कमी होण्यास मदत मिळेल.
सध्या मध्य रेल्वेकडे फक्त दोन 15 डब्यांचे रेक आहेत आणि त्यांचा वापर करून दररोज रेल्वेच्या 22 फेऱ्या होतात. उर्वरित फेऱ्या सेवा 12 डब्यांच्या रेक्स वापरून चालवल्या जातात. 15 डब्यांच्या गाड्यांच्या थांब्यासाठी अधिक लांब प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते, आणि ते सध्या फास्ट ट्रेनच्या मार्गिकांवर केवळ 10 स्थानकांवर उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण ही ती स्थानके आहेत.
मुंबईत बनतोय ‘पाताळ लोक’; तीन वर्षांत वाहतूक कोंडीपासून सुटका, फडणवीसांचा मेगा प्लॅन काय? पाहा
शनिवारी, 20 बारा-डब्यांच्या गाड्यांमध्ये तीन डबे वाढवून 15 डब्यांचे करण्यासाठी रेल्वेकडून निविदा काढण्यात आली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. 15 डब्यांच्या रेल्वेमध्ये 12 डब्यांच्या रेकपेक्षा सुमारे 1,200 अधिक प्रवासी प्रवास करू शकतात.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “12 डब्यांच्या लोकलला 15 डब्यांच्या रूपात बदलण्याची योजना बराच काळ प्रलंबित होती. पण मुंब्रा दुर्घटनेनंतर हा प्रस्ताव गतीने पुढे नेण्यात आला.” निविदा मंजूर झाल्यानंतर आणि काम सुरू झाल्यावर, सर्व 20 बारा-डब्यांच्या रेक्सना 15 डब्यांच्या रेक्समध्ये रूपांतरित करण्यास साधारण एक वर्ष लागू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व 20 गाड्यांचे रूपांतर पूर्ण झाल्यावर, मध्य रेल्वेला दररोज आणखी सुमारे 3 लाख प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता मिळेल.
मराठी माणसाला धोक्याचा इशारा, सावध राहण्याचा सल्ला, राज ठाकरे म्हणाले…
या स्थानकांवर थांबणार गाड्या
पण त्यासाठी 2026 च्या मध्यापर्यंत महत्त्वाच्या प्लॅटफॉर्म्स ला वाढवण्याचे काम करण्यात येणार आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत या स्थानकांवर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे- CSMT, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, वांगणी आणि खडवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
