Raigad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये घडली होती. एका 90 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती.
हिराबाई जोशी घरी एकट्याच राहत होत्या. अलीकडेच त्यांना जमिनीचे सुमारे 15 लाख रुपये मिळाले होते. त्या पैशांपैकी काही रक्कम त्यांनी आपल्या मुलींना दिली होती. तथापि, पैशांच्या या व्यवहारामुळे त्यांचा जावई सुरेश पाटील (वय 49) याच्या मनात लोभ वाढला. त्याने सासूबाईंकडे आणखी पैशांची मागणी केली होती. हिराबाई यांनी नकार दिल्याने संतापून त्याने त्यांच्या राहत्या घरात घुसून लाकडी दांड्याने त्यांच्यावर निर्दयी प्रहार केले. या मारहाणीमुळेच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Beed Crime : बीडमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर नात्यातीलच नराधमाकडून अत्याचार, पीडितेच्या आईवर ग्रामस्थांचा दबाव; महाराष्ट्र हादरला
पोलिसांनी केलेल्या तपासातून आरोपीवर संशय गेला आणि त्याला काही तासांतच ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत सुरेश पाटीलने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हृदयद्रावक घटनेनं मोठे भोम गाव शोकमग्न झालं असून पैशांच्या हव्यासापोटी वृद्धेची हत्या झाल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा घटनांनी समाजातील नैतिकतेचे अध:पतन अधोरेखित होत असून, वृद्धांच्या सुरक्षेबाबत चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
Smriti Mandhana Palash Muchhal Wedding : स्मृतीचं लग्न लांबणीवर, नवरदेव पलाश मुंबईला, विवाहपूर्व सोहळ्याचे फोटोही डिलीट, मानधनांच्या घरात काय घडलं?
पिकनिकसाठी आलेल्या तरुणावर वार करत हत्या
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिना संगम नदी घाट परिसरात काल रविवारी संध्याकाळी चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली. या हल्ल्यात 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पिकनिकसाठी गेलेल्या युवकांवर झालेल्या या हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
