Mumbai Metro : मेट्रो मार्गिका 9 टप्पा 2 कार्यान्वित होण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल; एकात्मिकरण सॉफ्टवेअर चाचण्यांसाठी सकाळी विशेष वाहतूक ब्लॉक
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून युद्ध पातळीवर मेट्रोच्या विविध प्रकल्पांचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे मेट्रो मार्गिका 9 चा टप्पा 2 कार्यान्वित होण्याच्या दिशेला महत्त्वाचं पाऊल उचलण्यात येत आहे. 15 ते 25 सप्टेंबर या काळात आवश्यक सिग्नलिंग आणि मेट्रो गाड्यांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मेट्रो मार्गिका 2 अ, 7 आणि मार्गिका 9 टप्पा 1 वरील प्रवासी सेवा सकाळी 6:30 वाजता सुरू होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मेट्रो मार्गिका ९ टप्पा २ कार्यान्वित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून, या टप्प्यातील तीन अतिरिक्त स्थानकांचे कार्यरत मेट्रो मार्गिका ९ टप्पा-१ तसेच विद्यमान मेट्रो नेटवर्कशी सुरळीत एकात्मिकरण करण्यासाठी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) तर्फे आवश्यक सिग्नलिंग आणि मेट्रो गाड्यांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण पूर्व-कार्यन्वयन चाचण्यांसाठी १५ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष सकाळचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि मार्गिका ९ टप्पा १ वरील प्रवासी सेवा सकाळी ६:३० वाजता सुरू होतील.
या विशेष ब्लॉकमुळे तांत्रिक पथकांना प्रवासी सेवा सुरू नसलेल्या कालावधीत सिग्नलिंग सॉफ्टवेअरचे मायग्रेशन, चाचणी आणि प्रमाणीकरण सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक सलग वेळ उपलब्ध होईल. त्याचवेळी प्रवासी सेवांवरील परिणाम केवळ सकाळच्या मर्यादित कालावधीपुरता ठेवण्यात आला आहे.
Manoj Jarange : माझ्या जवळच्या लोकांच्या चौकशी लावता; ईडीच्या कार्यालयाला घेराव घालणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
मार्गिका ९ टप्पा-२ कार्यान्वित करण्याच्या दिशेने आवश्यक चाचणी
मेट्रो मार्गिका ९ टप्पा २ च्या वेग चाचण्यांसाठी आवश्यक सिग्नलिंग सॉफ्टवेअर आता उपलब्ध झाले असून, त्यामुळे चाचणी आणि कार्यान्वयन प्रक्रियेतील पुढील महत्त्वाचा टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मार्गिका ९ टप्पा-२ चे कार्यरत मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि मार्गिका ९ टप्पा-१ शी सुरळीत एकात्मिकरण करण्यात येणार असल्याने, नवीन टप्प्यावरील सिग्नलिंग प्रणालीची विद्यमान कार्यरत नेटवर्कसोबत चाचणी आणि प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
Amit Shah : 2029 आधी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करु, अमित शाह यांची घोषणाया प्रक्रियेत चारकोप डेपो येथील ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (OCC) मार्फत सिग्नलिंग सॉफ्टवेअरचे नियंत्रित मायग्रेशन आणि चाचणी करण्यात येणार आहे. विद्यमान मार्गिकांवर नियमित वेळेत प्रवासी सेवा सुरू असल्याने, अशा महत्त्वपूर्ण तांत्रिक चाचण्या केवळ प्रवासी सेवा बंद असलेल्या नियंत्रित कालावधीतच करता येतात. त्यामुळे निर्धारित सुरक्षा आणि परिचालन मानकांनुसार एकात्मिकरण चाचण्या पूर्ण करण्यासाठी हा विशेष सकाळचा ब्लॉक आवश्यक आहे.
प्रवाशांनी १५ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि मार्गिका ९ टप्पा १ वरील प्रवासी सेवा सकाळी ६:३० वाजता सुरू होतील, याची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. मेट्रो मार्गिका ९ टप्पा-२ सुरक्षितपणे कार्यान्वित करण्याच्या दिशेने आवश्यक चाचण्या पूर्ण करण्यासाठी करण्यात येत असलेल्या या तात्पुरत्या परिचालन बदलादरम्यान प्रवाशांकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल MMMOCL आभार व्यक्त करते, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा