पुणे विमानतळावर बिबट्या दिसल्याने प्रशासन अलर्ट झालं आहे. प्रशासनाने तातडीने बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने महत्त्वाचं काम केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : लोहगाव येथील पुणे विमानतळावरील धावपट्टी आणि सीमाभींतीजवळ बिबट्या दिसल्याची तक्रार आल्याने वन विभाग आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी पाहणी केली. बिबट्या दिसलेल्या भागात तीन कॅमेरे बसविण्यात आले असून तेथील भुयारी मार्गांना जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. ट्रॅपमध्ये पुन्हा बिबट्या दिसल्यास त्याला पकडण्यासाठी सापळा रचून पिंजरे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे विमानतळावर गेल्या वर्षभरापासून एक बिबट्या मुक्काम ठोकून आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला धावपट्टीवर बिबट्याने दर्शन दिले होते. त्यानंतर प्रवाशांमध्ये भीती पसरल्याने विमानतळ प्रशासनाने वन विभाग आणि रेस्क्यू बचाव पथकाची मदत घेतली.
बिबट्याचा वावर असलेल्या भागात कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले, पिंजरे बसविण्यात आले होते. बचाव पथकांने बरेच दिवस बिबट्याच्या शोधात विमानतळ पिंजून काढला होता. पण बिबट्या हाती आला नाही. महिनाभरानंतर बिबट्याची चर्चा थांबली होती. मात्र, गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा बिबट्याने विमानतळावर नागरिकांना दर्शन दिले, त्याचे फोटोही कैद झाल्यामुळे प्रशासन सक्रीय झाले आहे. बाप रे बाप, ठाणे सिव्हिल रुग्णालयात साप; रुग्ण, डॉक्टर, नर्सेसची पळापळ, घटनेचा VIDEO समोर
सुरक्षेसाठी प्रशासनाची उपययोजना
सुरक्षेचा उपाय म्हणून वन विभाग, रेस्क्यू बचाव पथक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी विमातनळाच्या धावपट्टी, परिसराची पाहणी केली. या वेळी सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे, भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर वाय. एस. सिंग, परिक्षेत्र वन अधिकारी सुरेश वारक, शीतल खेंडके, प्रमोद रासकर आणि रेस्क्यूचे किरण राहळकर उपस्थित होते. ‘आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही…’, धनंजय मुंडे यांना भर प्रचारसभेत वाल्मिक कराडची आठवण?
बिबट्याला पकडण्यासाठी काय निर्णय झाले?
बिबट्या दिसलेल्या परिसरात फिरून करून तेथे नवीन तीन कॅमेरे ट्रॅप बसविण्यात आले. त्या परिसरातील विविध खंदक, भुयारी मार्ग, बोगद्यांचीही सखोल पाहणीही करण्यात आली. भारतीय हवाई दलाने आता या बोगद्यांमध्ये बिबट्या लपून बसणार यासाठी लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. मात्र, विमानतळावरील गवताळ भाग आणि झुडुपांमध्ये तो लपण्याची शक्यता असल्याने कॅमेरा ट्रॅपी संख्या वाढविण्याबाबतही या वेळी चर्चा झाली. बिबट्या पुन्हा दिसल्यास त्याला पकड्यासाठी पिंजरा ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा