Maharashtra Rain News: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाकडून राज्यातील आठ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईतही जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने मुंबईला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबईला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर, ठाणे, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसतील.
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे नवे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या पुढील तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
Delhi Flood: यमुनामाई दिल्लीवर कोपली! सारं बुडालं, संसार उद्ध्वस्त, डोक्यावर सामान घेऊन घरं सोडण्याची वेळ
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावासासाठी अनुकूल हवामान तयार झालं आहे. कोकण आणि घाटमाध्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकणला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यादरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
आठ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
पुण्यासह आठ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी (3 सप्टेंबर) राज्यातील पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती आहे. राज्यातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर, गोंदियामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोलीत मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

