Beed Crime News : बीडमध्ये भयंकर घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि गावच्या सरपंचाने घरात घुसून एका तरुणाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. सरपंचासह सहा जणांनी हा हल्ला केला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनं बीड जिल्हा हादरला आहे.
‘२९ जुलै रोजी माझा मित्र रमेश संतराम राठोड हा अंगणवाडी सेविका सुनिता विजय चव्हाण तिला तीन अपत्य विषयी घेऊन अंगणवाडीमध्ये भ्रष्टाचाराविरोधात जिल्हा परिषद बीड येथे उपोषणास बसल्यामुळे मी त्यास भेटण्यास गेलो असता. त्या ठिकाणी पत्रकाराने माझा फोटो पेपरमध्ये छापल्याचा राग मनात धरुन वसंत ताराचंद चव्हाण यांनी घरी येऊन वहिनीला सगिंता धनाजी चव्हाण यांना तुझा दिर माझ्या सुनाच्या विरोधात लोकांना भडकावतो असं म्हणून, त्याला गावाकडे येऊदे त्याला जिवे सोडत नाही असं धमकावलं होतं.
Pune Traffic News: पुण्यात पोलिस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सव काळात कसं असेल वाहतुकीचं नियोजन? आयुक्तांनी केलं स्पष्ट
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, ‘१९ ऑगस्ट रोजी गावी गेल्यानंतर सायंकाळी ७:०० वाजेच्या दरम्यान उपरोक्त आरोपीने घरी येऊन घरावर दगडफेक केली. आणि घरात घुसून वसंत चव्हाण याने हतातील कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली नंतर माझी वहिनी, भाऊ, आई यांनी सोडवासोडव करत असताना रोहिदास याने त्याच्या हातातील कोयत्याने माझ्या डोक्यात मारत असताना वहिनीने मला वाचवण्याकरिता हात टाकला. त्यावेळी त्यांच्या हाताला गंभीर मार लागून ३ टाके पडले आहेत. त्यांचा आज खून करू असं वारंवार वसंत चव्हाण इतर आरोपींना बोलत होता’.
आमदाराच्या आईला हार्ट अटॅक; शिंदे मदतीला धावले, एअर अॅम्ब्युलन्स पाठवली अन् स्वत: विमानतळावरही पोहोचले!
‘आरोपी वसंत चव्हाण हा राष्ट्रवादी पक्षाचा सरपंच असून गुंड आहे त्याच्यावर आणि इतर आरोपींवर देखील गंभीर गुन्हे असून खोटी केस सुरु आहे. आम्ही दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर सिरसाळा पोलीस स्टेशन येथे गेलो असता पोलिसांनी खोटी, चुकीची तक्रार घेऊन इतर आरोपींचे नाव वगळले आहे. यावरील आरोपींपासून आमच्या जिवाला धोका आहे. वरील आरोपींवर कठोर कारवाई करुन मला न्याय द्यावा’, अशी विनंती यावेळी पिडीत नागरिकांनी केली आहे.

