• Fri. Jun 26th, 2026
    केतनला फरफटत नेऊन दरीत ढकललं? लोहगडाच्या गवतावर संशयास्पद खुणा, चेतनशी झटापट झाल्याचाही अंदाज

    Pune Lohagad Trek Ketan Agarwal Death : घटनास्थळी आढळलेल्या गवतावरील व्रण आणि दाबलेल्या भागामुळे केतनने प्रतिकार केला असावा, अशी शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : केतन अग्रवालला बोलण्यात गुंतवून सिया गोयलने कड्यालगत नेले आणि आधीच दबा धरून बसलेल्या चेतन चौधरीने मागून येऊन त्याला दरीत ढकलल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळाचा पंचनामा आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलिस संपूर्ण घटनाक्रमाची सखोल पडताळणी करीत आहेत. घटनास्थळी आढळलेल्या गवतावरील व्रण आणि दाबलेल्या भागामुळे केतनने प्रतिकार केला असावा, अशी शक्यता तपास यंत्रणा तपासत आहे.

    पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, आरोपींशी झटापट झाल्यानंतर त्याला कड्याच्या दिशेने ओढत नेले असावे. मात्र, नेमका घटनाक्रम काय होता, याबाबत आरोपींची चौकशी, तांत्रिक पुरावे आणि इतर साक्षींच्या आधारे पुढील तपास सुरू असून, त्यातून अधिक माहिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
    Maharashtra TimesPune Crime : तुमची सिया अगदीच विशीची आहे हो! अगरवाल कुटुंबाने सोयरीक नाकारलेली, गोयलांचा हट्ट, केतनचं लग्न कसं जुळलेलं?

    संधीची वाट पाहत चेतन लपलेला

    लोहगड किल्ल्यावरून १८ जूनला पडून केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासवले होते. मात्र, तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांनंतर त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासानुसार, चेतन चौधरी हा सिया आणि केतन यांच्या आधीच लोहगड परिसरात पोहोचला होता. गडावरील पायऱ्यांच्या मार्गाजवळ तो त्यांच्या आसपास वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य संधीची वाट पाहून तो परिसरात थांबला असावा, अशी शक्यता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहे.

    तुकाराम मुंढेंना चार महिन्यातच पालक सचिवपदाच्या जबाबदारीतून मुक्त केलं, कारण काय?

    चेतनने मागून धक्का दिल्याचा संशय

    तपासातील प्राथमिक माहितीनुसार, सियाने कमी वर्दळीच्या आणि कड्यालगतच्या ठिकाणी केतनला नेले. त्याला संभाषणात गुंतवून बेसावध केले असताना चेतन मागून आला आणि त्याला धक्का दिल्याचा संशय आहे. त्यानंतर चेतन घटनास्थळावरून निघून गेला, तर सियाने आरडाओरडा करून हा अपघात असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
    Maharashtra TimesRakhi Agarwal : माझ्या घरी ड्रिंक चालत नाही, पार्टीलाही पाठवणार नाही; केतनच्या आईने बजावलेलं, सियाच्या 3 गोष्टींमुळे राखी अगरवालना संशय

    केतनशी झटापट, ओढत नेलं?

    घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला. या पंचनाम्यादरम्यानही काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. कड्याजवळील वाढलेल्या गवतात फरफट झाल्यासारख्या खुणा दिसून आल्या. त्यावरून केतन आणि आरोपींमध्ये झटापट झाली असावी का, याचाही तपास सुरू आहे. पोलिसांच्या मते, त्या ठिकाणावरून एखाद्या व्यक्तीचा सहज तोल जाऊन दरीत पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे प्रत्येक पुराव्याची पोलिसांकडून बारकाईने छाननी केली जात आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा