MVA Meeting skipped by MLAs : “महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत, असं म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का?” असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच बुधवारी महाविकास आघाडीने आमदारांची विशेष बैठक मुंबईत बोलावली होती. या बैठकीला तिन्ही पक्षांच्या एकूण ६० आमदारांपैकी केवळ ३७ आमदार उपस्थित राहिल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. आघाडीतील समन्वय आणि संघटनात्मक ताकदीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे कळते.
मविआच्या बैठकीला कोण कोण हजर?
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह संजय राऊत, शशिकांत शिंदे आणि सतेज पाटील उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. विधिमंडळात जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे, सभागृहात आणि सभागृहाबाहेर संयुक्त भूमिका घेणे, तसेच सर्व घटक पक्षांमध्ये अधिक समन्वय राखण्यावर भर देण्यात आला.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. अलीकडील पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर ‘जे गेले त्यांचा विचार करू नका, पुढील लढाईवर लक्ष केंद्रित करा’, असा संदेशही नेतृत्वाने दिल्याचे समजते. Pune Crime : केतनला फरफटत नेऊन दरीत ढकललं? लोहगडाच्या गवतावर संशयास्पद खुणा, चेतन-सियाशी झटापट झाल्याचाही अंदाज मात्र, या बैठकीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मविआचे सुमारे ६० आमदार आणि विधान परिषद सदस्य उपस्थित राहणे अपेक्षित असताना केवळ ३७ सदस्यांनीच हजेरी लावली. त्यामुळे एकजुटीचा संदेश देण्यासाठी आयोजित बैठकीतच जवळपास निम्मे सदस्य गैरहजर राहिल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, अस्लम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, रोहित पवार, उत्तमराव जानकर, संदीप क्षीरसागर, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सुनील राऊत, गजानन लवटे, बाबाजी काळे हे आमदार अनुपस्थित असल्याची माहिती आहे. Mayank Lohar : आमचा आधार हरपला, मयंकच्या आईचा टाहो; डब्यातले 30 प्रवासी काय करत होते? धाकट्या बहिणीचा उद्विग्न सवाल
‘खरंच एकत्र आहोत?’
महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आघाडीतील समन्वयाबाबत स्पष्टपणे चिंता व्यक्त केल्याची माहिती आहे. “महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत असे म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सभागृहात विरोधी पक्ष म्हणून एकत्रित भूमिका मांडली जाते का, एकाच मुद्द्यावर आक्रमकपणे लढले जाते का, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. विधिमंडळ अधिवेशनात तसेच सभा, आंदोलने आणि जनसंपर्क कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा