• Tue. Mar 10th, 2026

    शहापूरमध्ये तरुणाने महिलेला संपवलं, हत्येचा छडा लावत आरोपी ताब्यात

    ByMH LIVE NEWS

    Aug 24, 2025
    शहापूरमध्ये तरुणाने महिलेला संपवलं, हत्येचा छडा लावत आरोपी ताब्यात

    Thane Shahapur Crime : शहापूरमध्ये एका फार्महाऊसवर वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. या घटनेचा पोलिसांनी उलगडा केला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. महिलेला मारुन तिच्या अंगावरील दागिनेही चोरण्यात आले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    महेश गायकवाड, ठाणे : शहापूर तालुक्यातील एका फार्महाऊमध्ये एका ज्येष्ठ महिलेची हत्या केल्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने चोरी करत अन्य एका ज्येष्ठ महिलेवर जिवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत तरुणाला अटक केली आहे. कपड्याचे दुकान चालवणारा हा तरुण कर्जबाजारी झाला होता. त्याला दुकानात कपडे खरेदी करायचे होते. त्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याची बाब चौकशीत समोर आल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

    ठाण्यातील घोडबंदर भागातील पातलीपाडा येथे राहणारे नरेश दलवाणी (५७) यांचे शहापूर तालुक्यातील गांडुळवाड येथे फार्म हाऊस आहे. या फॉर्म हाऊसमध्ये आरोपीने प्रवेश करत नरेश यांची बहिण विना हरपलानी (७५) यांची हत्या केली. नंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, हातातील बांगड्यांची चोरी केली. तसेच, आरोपीने नरेश यांची ९७ वर्षांची आई लक्ष्मी दलवाणी यांच्यावर हत्याराने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचा हा प्रकार १८ ऑगस्टच्या रात्री ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान घडला होता. या प्रकरणी किन्हवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
    Maharashtra Timesपिकाला खत देण्यासाठी गेला, पंप चालू केला आणि अनर्थ घडला; शेतातच तरुण शेतकऱ्याचा अंत, कुटुंबावर शोककळा
    गुन्ह्याचे गांभीर्य पाहता ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, रोहन शेलार, दिपेश किणी यांचे पथक करत होते.
    Maharashtra Timesकंपनीचं काम करुन निघाला, वाटेत काळाचा घाला; ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबाचा टाहो
    या पथकाने परिसरात काम करणारे कामगार, स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याची उकल करत शिवाजी धसाडे (२७) याला ताब्यात घेत अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला किन्हवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    Nagpur Crime News | जुगारापायी सॉफ्टवेअर इंजिनिअर सगळंच गमावलं, आता थेट तुरुंगात रवानगी

    दागिन्यांची तत्काळ विक्री

    शहापूर तालुक्यातील ढाकणे येथे राहणारा आरोपी शिवाजी याने डोळखांब येथे कपड्याचे दुकान उघडले होते. मात्र, तो कर्जबाजारी झाला होता. पुढे सण, उत्सव असल्याने त्याला दुकानात कपडे खरेदी करायचे होते. त्याकरीता चोरलेल्या दागिन्यांची आरोपीने तत्काळ विक्री केली. या विक्रीतून त्याला चार लाख रुपये मिळाले होते. हे पैसे त्याच्या बॅंक खात्यात जमा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक दिपेश किणी यांनी दिली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा