• Sat. Aug 15th, 2026

आदित्य ठाकरेंच्या मागे थांबले, समोर येताच पाठीवर थाप, नितेश राणेंनी काय केलं?

आदित्य ठाकरेंच्या मागे थांबले, समोर येताच पाठीवर थाप, नितेश राणेंनी काय केलं?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एरवी ठाकरे विरुद्ध राणे असा सामना राजकीय वर्तुळात रंगत असला तरी आज मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे माध्यमांशी बोलत होते. नेमके त्याच वेळी भाजपचे नेते व मंत्री नितेश राणे यांची एन्ट्री झाली. एवढंच नाही तर आदित्य ठाकरे बोलत असल्यामुळे नितेश राणे तिथे थांबले आणि जेव्हा आदित्य ठाकरे समोर आले तेव्हा त्यांच्याकडे पाहून राणे हसलेही. शिवाय राणेंनी यावेळी आदित्य यांच्या पाठीवर थापही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed