Uday Samant: भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. यावेळी चर्चेत आमदार कैलास पाटील, दिलीप लांडे यांनी सहभाग घेतला.
‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडे पाठविलेल्या प्रस्तावास पुढील दोन महिन्यांत मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र राज्य शासन केवळ केंद्राच्या धोरणांवर अवलंबून न राहता मराठी भाषेच्या जागतिक प्रसारासाठी स्वतंत्र उपक्रम राबवत आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीची मालकी महाराष्ट्र शासनाने घेतली असून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ‘ मराठी भाषा वैश्विक केंद्र ’ सुरू करण्यात येणार आहे. जगभरातील मराठी भाषिकांसाठी हे केंद्र महत्त्वाचा दुवा ठरेल’, असे त्यांनी सांगितले.
Mumbai Rain Ritu Tawde: अर्रर्र…! महापौर रितू तावडेंकडून नालेसफाईचं कौतुक; मागे BMCचा अधिकारीच मॅनहोलमध्ये पडला
‘पुढील तीन महिन्यांत समित्या’
‘मराठी भाषेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध समित्या पुढील तीन महिन्यांत स्थापन करण्यात येतील. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती स्थापन करण्यात आली आहे’, असे सामंत यांनी स्पष्ट केले. ‘मराठी भाषेसाठी सर्वपक्षीय आमदारांची समिती पुढील १५ दिवसांत स्थापन केली जाईल. या समितीच्या मार्गदर्शनात सुधीर मुनगंटीवार यांचा सक्रिय सहभाग असेल’, असेही सामंत यांनी सांगितले.
Electricity News: राज्यात सध्या कुठेही लोडशेडिंग नाही! मुख्यमंत्र्यांचा थेट सभागृहात दावा, वीज पुरवठ्याबद्दल नेमकं काय म्हणाले?
‘प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकारी’
राज्यातील शासकीय कार्यालयांमधील मराठी फलक, नामफलक आणि सूचनाफलकांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र ‘मराठी भाषा अधिकारी’ नियुक्त करून त्यांना स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मराठी भाषा विषयक समित्यांचे कामकाज प्रभावीपणे राबविले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
