मुंबई – प्रतिनिधी
अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ‘ईडी’ने शनिवारी भारतात दोन दिवसांमध्ये पाच राज्यांमधील छापेमारीनंतर एका काँग्रेस आमदाराचा अटक केली आहे. अटक करण्यात आलेला काँग्रेस आमदार हा कर्नाटकातील असून तो बेकायदेशीर बेटिंग रॅकेट चालवत असल्याचा ठपका ‘ईडी’ने ठेवला आहे. काँग्रेसच्या ज्या आमदाला अटक करण्यात आली आहे त्यांचं नाव के सी वीरेंद्र ‘पपी’ असं आहे. या आमदाराला सिक्कीममधून एका कथित बेकायदेशीर बेटिंग रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान या आमदाराचा दुबईतील आंतरराष्ट्रीय कॅसिनो आणि गेमिंग ऑपरेशन्सशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. या माध्यमातून एक मोठे बेकायदेशीर बेटिंग नेटवर्कचा भांडाफोड झाला आहे.
22 आणि 23 ऑगस्ट रोजी सिक्कीम, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र आणि गोवा यासह अनेक राज्यांमध्ये ‘ईडी’कडून छापे टाकण्यात आले. तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी गोव्यात पाच कॅसिनोंवर छापेमारी केली. छापेमारी करण्यात आलेल्या कसिनोंमध्ये ‘पपीज कॅसिनो गोल्ड’, ‘ओशन रिव्हर्स कॅसिनो’, ‘पपीज कॅसिनो प्राइड’, ‘ओशन 7 कॅसिनो’ आणि ‘बिग डॅडी कॅसिनो’चा समावेश आहे.
दुबई कनेक्शन…
‘ईडी’च्या म्हणण्यानुसार, काँग्रेस आमदार ‘किंग 567’ आणि ‘राजा 567’ सारख्या अनेक बेटिंग वेबसाइट चालवत होता. तर आमदाराचा भाऊ के सी थिप्पेस्वामी दुबईमधून कॉल सेंटर सेवा आणि गेमिंग ऑपरेशन्सशी जोडलेल्या तीन संस्था चालवत असल्याचं समोर आलं आहे. ‘ईडी’ने एमजीएम, बेलाजियो, मेट्रोपॉलिटन, मरीना आणि कॅसिनो ज्वेलकडून अनेक आंतरराष्ट्रीय कॅसिनो मेंबरशीप कार्ड्स, तसेच ‘ताज’, ‘हयात’ आणि ‘द लीला’ या लक्झरी हॉटेलमधील मेंबरशीप आणि अनेक उच्च मूल्यांची क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील जप्त करण्यात आली आहेत.
6 कोटींचं सोनं, 12 कोटी रोख अन्…
छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांना 12 कोटी रुपये रोख सापडले, ज्यामध्ये एक कोटी रुपयांच्या परकीय चलनाचाही समावेश आहे. या काँग्रेस आमदाराकडे 6 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सुमारे 10 किलो चांदीचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत. या आमदाराकडे सारख्याच व्हीआयपी नंबर प्लेट असलेल्या तीन आलिशान कार्स देखील सापडल्यात.
https://platform.twitter.com/embed/Tweet.html?creatorScreenName=zee24taasnews&dnt=false&embedId=twitter-widget-0&features=eyJ0ZndfdGltZWxpbmVfbGlzdCI6eyJidWNrZXQiOltdLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X2ZvbGxvd2VyX2NvdW50X3N1bnNldCI6eyJidWNrZXQiOnRydWUsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdHdlZXRfZWRpdF9iYWNrZW5kIjp7ImJ1Y2tldCI6Im9uIiwidmVyc2lvbiI6bnVsbH0sInRmd19yZWZzcmNfc2Vzc2lvbiI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfZm9zbnJfc29mdF9pbnRlcnZlbnRpb25zX2VuYWJsZWQiOnsiYnVja2V0Ijoib24iLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X21peGVkX21lZGlhXzE1ODk3Ijp7ImJ1Y2tldCI6InRyZWF0bWVudCIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfZXhwZXJpbWVudHNfY29va2llX2V4cGlyYXRpb24iOnsiYnVja2V0IjoxMjA5NjAwLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X3Nob3dfYmlyZHdhdGNoX3Bpdm90c19lbmFibGVkIjp7ImJ1Y2tldCI6Im9uIiwidmVyc2lvbiI6bnVsbH0sInRmd19kdXBsaWNhdGVfc2NyaWJlc190b19zZXR0aW5ncyI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdXNlX3Byb2ZpbGVfaW1hZ2Vfc2hhcGVfZW5hYmxlZCI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdmlkZW9faGxzX2R5bmFtaWNfbWFuaWZlc3RzXzE1MDgyIjp7ImJ1Y2tldCI6InRydWVfYml0cmF0ZSIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfbGVnYWN5X3RpbWVsaW5lX3N1bnNldCI6eyJidWNrZXQiOnRydWUsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdHdlZXRfZWRpdF9mcm9udGVuZCI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9fQ%3D%3D&frame=false&hideCard=false&hideThread=false&id=1959469037194489964&lang=mr&origin=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Findia%2Fed-raid-news-rs-12-crore-cash-6-crore-gold-congress-mla-arrested-in-betting-racket%2F934731&sessionId=8675106bed49526a61dc771f145b398a9b521e93&siteScreenName=zee24taasnews&theme=light&widgetsVersion=2615f7e52b7e0%3A1702314776716&width=550px
17 बँक खाती गोठवली
तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीने 17 बँक खाती, दोन लॉकर देखील गोठवले असून वीरेंद्रचे भाऊ के सी नागराज आणि पुतणी पृथ्वी एन राज यांच्याशी संबंधित मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहेत.
https://platform.twitter.com/embed/Tweet.html?creatorScreenName=zee24taasnews&dnt=false&embedId=twitter-widget-1&features=eyJ0ZndfdGltZWxpbmVfbGlzdCI6eyJidWNrZXQiOltdLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X2ZvbGxvd2VyX2NvdW50X3N1bnNldCI6eyJidWNrZXQiOnRydWUsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdHdlZXRfZWRpdF9iYWNrZW5kIjp7ImJ1Y2tldCI6Im9uIiwidmVyc2lvbiI6bnVsbH0sInRmd19yZWZzcmNfc2Vzc2lvbiI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfZm9zbnJfc29mdF9pbnRlcnZlbnRpb25zX2VuYWJsZWQiOnsiYnVja2V0Ijoib24iLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X21peGVkX21lZGlhXzE1ODk3Ijp7ImJ1Y2tldCI6InRyZWF0bWVudCIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfZXhwZXJpbWVudHNfY29va2llX2V4cGlyYXRpb24iOnsiYnVja2V0IjoxMjA5NjAwLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X3Nob3dfYmlyZHdhdGNoX3Bpdm90c19lbmFibGVkIjp7ImJ1Y2tldCI6Im9uIiwidmVyc2lvbiI6bnVsbH0sInRmd19kdXBsaWNhdGVfc2NyaWJlc190b19zZXR0aW5ncyI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdXNlX3Byb2ZpbGVfaW1hZ2Vfc2hhcGVfZW5hYmxlZCI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdmlkZW9faGxzX2R5bmFtaWNfbWFuaWZlc3RzXzE1MDgyIjp7ImJ1Y2tldCI6InRydWVfYml0cmF0ZSIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfbGVnYWN5X3RpbWVsaW5lX3N1bnNldCI6eyJidWNrZXQiOnRydWUsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdHdlZXRfZWRpdF9mcm9udGVuZCI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9fQ%3D%3D&frame=false&hideCard=false&hideThread=false&id=1959163334508392914&lang=mr&origin=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Findia%2Fed-raid-news-rs-12-crore-cash-6-crore-gold-congress-mla-arrested-in-betting-racket%2F934731&sessionId=8675106bed49526a61dc771f145b398a9b521e93&siteScreenName=zee24taasnews&theme=light&widgetsVersion=2615f7e52b7e0%3A1702314776716&width=550px
कोर्टात हजर केलं
50 वर्षीय काँग्रेस आमदाराला दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने काँग्रेस आमदाराला बेंगळुरू न्यायालयात हजर करण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे.
काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र ‘पपी’ यांना कशामुळे अटक झाली?
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र ‘पपी’ यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 23 ऑगस्ट 2025 रोजी सिक्कीममधील गंगटोक येथून बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन बेटिंग रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक केली.
ईडीने कोणत्या ठिकाणी छापेमारी केली?
ईडीने 22 आणि 23 ऑगस्ट 2025 रोजी सिक्कीम, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र आणि गोवा येथील 31 ठिकाणांवर छापेमारी केली. गोव्यातील ‘पपीज कॅसिनो गोल्ड’, ‘ओशन रिव्हर्स कॅसिनो’, ‘पपीज कॅसिनो प्राइड’, ‘ओशन 7 कॅसिनो’ आणि ‘बिग डॅडी कॅसिनो’ या पाच कॅसिनोंवरही छापे टाकण्यात आले.
छापेमारीत काय जप्त करण्यात आलं?
ईडीने छापेमारीदरम्यान 12 कोटी रुपये रोख (यामध्ये 1 कोटी परकीय चलन), 6 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 10 किलो चांदीचे दागिने, चार आलिशान वाहने, 17 बँक खाती आणि दोन बँक लॉकर गोठवले. तसेच, वीरेंद्र यांचे भाऊ के. सी. नागराज आणि पुतणे पृथ्वी एन. राज यांच्याशी संबंधित मालमत्तेची कागदपत्रेही जप्त केली.
के. सी. वीरेंद्र यांचा दुबईशी कसा संबंध आहे?
ईडीच्या तपासात समोर आले की, वीरेंद्र यांचा भाऊ के. सी. थिप्पेस्वामी दुबईमधून ‘डायमंड सॉफ्टटेक’, ‘टीआरएस टेक्नॉलॉजीज’ आणि ‘प्राइम9 टेक्नॉलॉजीज’ या तीन कंपन्यांमार्फत कॉल सेंटर आणि गेमिंग ऑपरेशन्स चालवत आहे, ज्या बेटिंग रॅकेटशी जोडलेल्या आहेत.
About the Author
