• Tue. Sep 8th, 2026
अहो ऐका ना, एक सेल्फी घ्या! नदी पुलावर थांबले, फोटो घेताच महिलेने घेतली उडी, नेमकं काय घडलं?

Nagpur Crime News : कन्हान नदीवरील नेरी पुलावरुन एका २३ वर्षीय विवाहित महिलेने शनिवारी दुपारी उडी मारून आयुष्य संपवलं. महिला पतीसोबत निर्माल्य टाकण्यासाठी आली होती. त्यावेळी महिलेने अचानक टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)

जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीवरील नेरी पुलावर शनिवारी दुपारी एक धक्कादायक घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नदीच्या पुलावर निर्माल्य टाकण्यासाठी थांबलेल्या २३ वर्षीय महिलेने अचानक पुलावरुन नदीत उडी मारली. रामटेक तालुक्यातील काचूरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय २३) असं मृत महिलेचं नाव आहे. महिला सध्या नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय साकोरेसोबत राहत होती.

पुलावर निर्माल्य टाकण्यासाठी गेले आणि महिलेचं धक्कादायक कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास साकोरे दाम्पत्य कारमधून काचूरवाही गावाकडे जात होते. त्यावेळी नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीच्या नेरी पुलावर थांबले. दोघांनी गाडी थांबवून काही वेळ त्या पुलावर घालवला. या दरम्यान दोघांनी मोबाईलवर सेल्फी देखील काढला. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेलं निर्माल्य नदीत टाकण्यास सुरुवात केली. मात्र, निर्माल्य टाकतानाच ज्ञानेश्वरीने अचानक पुलावरून नदीत उडी मारली. हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना जबर धक्का बसला. त्यांनी आरडाओरडा केली. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालं.
Jalgaon News : सगळे गाढ झोपलेले, अचानक बस पुलावरुन थेट नदीत कोसळली, जळगावात मोठा अनर्थ टळला

कौटुंबिक वाद कारण असल्याची प्राथमिक माहिती

पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र, सायंकाळ होताच अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवावं लागलं. रविवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केलं. दरम्यान, या धक्कादायक घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असावा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पती – पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी विजय साकोरे याचाही जबाब नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.

नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घर पालिकेडून जमीनदोस्त

स्थानिक नागरिक आणि पुलावरुन जाणाऱ्या प्रवाशांमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. शनिवारी दिवसभरात अनेकजण घटनास्थळावर गर्दी करत होते. सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू असून, पुलावर काढलेली दाम्पत्याचा सेल्फी हा घटनेतील अत्यंत वेदनादायक पैलू ठरत आहे. पोलिसांनी नागरिकांना अपप्रचार न करण्याचं आवाहन केलं आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.आणखी वाचा