• Sat. Mar 7th, 2026

    Thane News : ठाणेकरांनो कृपया लक्ष द्या! पाणी भरुन ठेवा, शुक्रवार-शनिवारी ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद

    Thane News : ठाणेकरांनो कृपया लक्ष द्या! पाणी भरुन ठेवा, शुक्रवार-शनिवारी ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद

    Thane Water Supply Cut : ठाण्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाण्यातील अनेक भागांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच त्यानंतर पुढचे एक-दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेकडून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    ठाणे : ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी ०२ मे,२०२५ रोजी सकाळी ९.०० ते शनिवार ०३ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात, ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करून पूर्ण २४ तास पाणी पुरवठा बंद न ठेवता टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    परिणामी, शुक्रवार, ०२ मे, २०२५ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकूम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तर, शुक्रवार, ०२ मे २०२५ रोजी रात्री ९.०० वाजेपासून शनिवार ०३ मे, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत समता नगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील काही भाग येथे पाणी पुरवठा बंद राहील.

    शटडाऊनच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल, दुरुस्तीची कामे आणि चेने येथे जलमापक बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed