Vasai Crime News : वसईमधील वाळीव परिसरात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीला लग्नाचं आमिष देऊन आणि इंजिनीअर असल्याचं भासवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
वसई महिला डॉक्टरवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, पालघर : मॅट्रिमोनिअल या संकेतस्थळवर आरोपी याने स्वतः आपण इंजिनीअर असून वार्षिक वेतन हे 37 लाख असल्याचं भासवत बनावट प्रोफाईल तयार केली. एका 30 वर्षीय महिला वैद्यकीय अधिकारी हिची फसवणूक केल्याचा आणि विवाहाचं आमिष दाखवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी शारीरिक ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील वसई येथील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून याबाबत अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे.
नेमकं प्रकरण काय?
या फसवणूकप्रकरणी वालीव पोलिसांनी नालासोपारा येथील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या सुभाष सातपुते (वय 34) याला अटक केली आहे. आरोपीने कुमार जाधव या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुभाष सातपुते याने जून महिन्यात एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर कुमार जाधव या नावाने प्रोफाइल तयार केली. या प्रोफाइलमध्ये स्वतःला इंजिनीअर असल्याचं तसेच वार्षिक उत्पन्न 37 लाख रुपये असल्याचं नमूद केलं होतं. वसई परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय महिला डॉक्टरने हे प्रोफाइल पाहिल्यानंतर विवाहासाठी संपर्क साधला.
त्यानंतर आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केल्याचं सांगितलं जातं. लग्नाआधी शारीरिक सुसंगतता तपासण्याच्या नावाखाली त्याने महिलेला एका प्लेबॉयसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. आरोपीने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संबंधित व्यक्तीला भेटल्याचं महिलेनं सांगितलं आहे. आरोपीच्या सांगण्यावरून महिलेनं शारीरिक संबंधांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो आरोपीला पाठविल्याचा आरोप आहे.
प्लेबॉय आणि आरोपी एकच व्यक्ती
यानंतर मात्र आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. ‘ज्योतिषाला विचारल्यानंतर तुझ्याशी लग्न केल्यास तीन महिन्यांत माझा मृत्यू होईल’, असं सांगून त्याने कथित अंधश्रद्धेचा आधार घेत महिलेला मानसिक धक्का दिल्याचा आरोप आहे. काही काळानंतर महिलेच्या लक्षात आलं की, मॅट्रिमोनिअल स्वतःला कुमार जाधव म्हणवून घेणारा व्यक्ती आणि तिला प्लेबॉय म्हणून भेटलेला व्यक्ती एकच असल्याचा संशय आहे. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली.
Pune Crime : सहा महिन्यांपूर्वी बारमध्ये बिलावरुन वाद, सर्वांसमोर अपमान झाल्यानं काटा काढायचं ठरवलं; पुण्यातील हरीश गंगावणे प्रकरणाचं कारण समोर
डिजिटल माध्यमांचा गैरवापर
या प्रकरणात बनावट ओळख, डिजिटल माध्यमांचा गैरवापर, फसवणूक आणि लैंगिक शोषणासंबंधी गंभीर आरोप समोर आले आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार पोलिसांकडून तपास सुरू आहे. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात असून आरोपी याने अजून किती जणांची फसवणूक केली आहे याची माहिती घेत आहे. तपासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये याची योग्य ती काळजी घेतली जात असल्याची माहिती वालीव पोलिसांनी दिली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा