• Sun. Sep 20th, 2026

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत कोणताही लोकप्रतिनिधी काजू तसेच बदाम खाण्यासाठी गेला नव्हता. त्यामुळे यावरून वाद घालणे योग्य नाही. काजू, बदाम हा विषय महत्त्वाचा नसून शेतकऱ्यांसाठी ही बैठक आयोजित केली होती तो महत्त्वाचा विषय आहे,’ असे सांगून मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी विरोधकांना फटकारले. त्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या.

टीकेला उत्तर

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे नांदेडला दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. या बैठकीत लोकप्रतिनिधींना काजू आणि बदाम देण्यात आल्याने वादंग निर्माण झाला आहे. राज्यात दुष्काळ पडलाय आणि लोकप्रतिनिधी काजू, बदामवर ताव मारून शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहेत, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या या टीकेचा मुंडे यांनी खरपूस समाचार घेतला.

Advocate Nilesh Ojha : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे वकील निलेश ओझा कोण आहेत? वाचा A टू Z माहिती‘बदामासाठी बैठक नव्हती’

‘त्या बैठकीला लोकप्रतिनिधी बदाम, काजू खाण्यासाठी गेले नव्हते. ती बैठक काय काजू, बदामासाठी घेतली होती का, असा संतप्त प्रश्न मुंडे यांनी केला. कोणत्याही बैठकीची एक व्यवस्था असते. बैठकीत चहापाणी, काजू, बदाम दिले जातात. काही गोष्टी वाढल्या जातात. तिथे कोणी काही काजू, बदाम खाण्यासाठी जात नाही. मुळात काजू, बदाम हा काही महत्त्वाचा विषय नाही. बैठक शेतकऱ्यांसाठी होती. तो विषय महत्त्वाचा आहे. निरर्थक वाद निर्माण करू नये,’ असे आवाहन त्यांनी केले.

‘दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक येते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून हे काम करते. आम्ही निवडणुका नसताना वीजमाफी केली. कर्जमुक्ती दिलीच ना? शेतकऱ्यांना आमच्यावर विश्वास आहे. आम्ही जागरुक राहून उपाययोजना करीत आहोत. ३२ हजार कोटींची कर्जमाफी, वीजबील माफी दिली आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक कसे घेता येईल, बी बियाणे कसे पोहोचवता येईल, हा प्रयत्न आहे; परंतु निसर्गाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या मागे आहोत. अन्न धान्य, चारा आणि पाण्याची व्यवस्था करीत आहोत,’ असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

Maharashtra TimesSahil Wakode : माझ्या साहिलला त्यांनी टॉर्चर करुन मारलं; IIT बॉम्बेतील विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं, आईचे उद्विग्न आरोपवेगवेगळी आंदोलने सुरू

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरही मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘सध्या आरक्षणावर वेगवेगळ्या समाजाची आंदोलने सुरू आहेत. धनगर, बंजारा, आदिवासींचे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाचे वेगवेगळ्या धर्तीवर आंदोलन सुरू आहे. यामुळे समाज विभाजित होतो. ही अस्वस्थता खालपर्यंत जाते. आम्ही आरक्षणाला पाठिंबा देतो,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी जालना, बीडला जाणार’-पंकजा मुंडे
‘एनडीआरएफ’चे काही नियम आहेत. त्यात परतीच्या पावसाच्या कधीपर्यंत पंचनामे करायचे हे ठरलेले आहे; परंतु त्यावर आम्ही थांबलेलो नाही. कृषिमंत्र्यांनी आज आढावा घेतला आहे. मी जालना आणि बीडमध्ये जाऊन पाहणी करणार आहे. पंचनामे आज आणि आठ दिवसांनी केल्याने फरक पडणार नाही. आम्ही आधीच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम सुरू केले आहे,’ असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed