Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात धक्कादायक घटना घडली. एका नराधम पित्याची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली. पत्नीने न्यायालयात साक्ष का दिली, या रागातून त्याने पत्नीचा खून केला.
नेमकं काय घडलं?
२०१९ साली आरोपी मारोती टिकेकर याने आपल्याच पोटच्या मुलीवर अत्याचार केला होता. या प्रकरणी नराधम पित्या विरोधात भोकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेची गांभीर्य ओळखत भोकर पोलिसांनी ४८ दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. न्यायालयाने २८ नोव्हेंबर २०१९ साली आरोपीला जन्मठेपाची शिक्षा सुनावली. आरोपीने शिक्षा भोगली. दरम्यान या प्रकरणी फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपीची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली. कारागृहातून सुटका झाल्यानंतर आरोपी मारोती हा आपल्या पत्नीसोबत राहत होता. मात्र पत्नीने आपल्या विरोधात साक्ष का दिली याचा राग त्याच्या मनात होता. याच कारणावरून तो पत्नी सुरेखासोबत वाद घालायचा.
Dombivli News : वाद टोकाला गेला आणि होत्याचं नव्हतं झालं, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचं प्रेयसीसोबत भयंकर कृत्य
डोंगराळ भागात पत्नीची हत्या –
२६ एप्रिल रोजी आरोपी मारोती याने लाकडं आणण्याचा बहाणा करून पत्नी सुरेखा हिला भोकर बायपास रोडवरील तलावालगत असलेल्या डोंगराळ भागात नेलं. त्यानंतर तिथेच त्याने दगडाने ठेचून पत्नीचा खून केला. दुसरीकडे भोकर पोलीस ठाण्यात मीसिंग दाखल करण्यात आली होती. पोलीस महिलेचा शोध घेत असताना भोकर बायपास रोडवरील एका डोंगराळ भागात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
Nanded News : मुलीवर अत्याचार प्रकरणात वडिलांची निर्दोष मुक्तता, पण पत्नीने साक्ष दिल्याचा राग; महिलेला संपवलं
पोलिसांच्या कसून चौकशीत आरोपीची कबुली –
दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी एक मानवी अर्धवट कवटी, हात, डोक्याचे केस, पायातील पैंजन, जोडवे, चप्पल, साडी आणि इतर साहित्य आढळून आलं. सापडलेल्या वस्तूवरून पोलिसांनी तपास सुरी केला. फरार असलेल्या महिलेचा पती नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपी मारोती याला अटक केली. मुलीच्या अत्याचार प्रकरणात साक्ष दिल्याच्या कारणावरुन त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली आरोपी पतीने दिली. या घटनेने भोकर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

