Pune Railway Mega Block: पुणे रेल्वेमार्गावर आजपासून पंधरा दिवसांचा ब्लॉक सुरू होत आहे. चार ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या ब्लॉकमुळे गणेशोत्सवात प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ब्लॉकच्या पहिल्याच दिवशी पुणे-दौंड-पुणे डेमूच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-दौंड-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसची सेवाही १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान रद्द राहणार आहे. याशिवाय काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, काही गाड्या नियमन करून विलंबाने धावणार आहेत. इंदूर-दौंड, हडपसर-जोधपूर, पुणे-जयपूर, दौंड-ग्वाल्हेर या गाड्या खडकी येथून सुटणार आहेत. या कालावधीत एकूण ४२ गाड्या पूर्णपणे रद्द करण्याचे नियोजन आहे, तर २५ गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.
Pune Crime : सहा महिन्यांपूर्वी बारमध्ये बिलावरुन वाद, सर्वांसमोर अपमान झाल्यानं काटा काढायचं ठरवलं; पुण्यातील हरीश गंगावणे प्रकरणाचं कारण समोरपुणे-लोणावळा-कर्जत-पनवेल- कल्याण-इगतपुरी-मनमाड; तसेच पुणे-सातारा-मिरज-पंढरपूर- कुर्डुवाडी-सोलापूर या पर्यायी मार्गांचा वापर केला जाणार आहे. विशेषतः तीन आणि चार ऑक्टोबरला ब्लॉकचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. या दोन दिवशी अनेक एक्स्प्रेस, डेमू आणि लोकल गाड्या रद्द, अंशतः रद्द किंवा वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
Baramati Crime: बारामती तालुक्यात मुख्य चौकात तरुणावर जीवघेणा हल्ला; दोघांचा शोध सुरू, जखमीवर पुण्यात उपचारतीन रेल्वेच्या वेळेत बदल
पुणे–बीडदरम्यान नवीन दैनंदिन एक्स्प्रेस सेवा सुरू करण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेने पुणे विभागातील तीन गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. २२ सप्टेंबरपासून पुणे–बीड एक्स्प्रेस सुरू होत असून, त्यासाठी परिचालनाच्या दृष्टीने पुणे–अमरावती, पुणे–सोलापूर आणि पुणे–कन्याकुमारी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक ११४०५ पुणे–अमरावती एक्स्प्रेस २५ सप्टेंबरपासून पुण्याहून रात्री १०.५५ वाजता सुटेल. यापूर्वी ही वेळ रात्री १०.४५ होती. दौंड येथे ही गाडी रात्री १२.२८ ते १२.३० या वेळेत थांबेल. गाडी क्रमांक ११४१७ पुणे–सोलापूर एक्स्प्रेस २२ सप्टेंबरपासून पुण्याहून रात्री ११.०५ वाजता सुटेल. सध्या ही गाडी रात्री ११ वाजता सुटते. दौंडमधील थांब्याची वेळ रात्री १.२५ ते १.३० अशी करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १६३८१ पुणे–कन्याकुमारी एक्स्प्रेस २२ सप्टेंबरपासून पुण्याहून रात्री ११.२० वाजता सुटेल. यापूर्वी ती रात्री ११.४५ वाजता सुटत होती.
