Amul Milk Price Hike by RS 2 :अमूल दुधाच्या किंमतीत देशभरात प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भाववाढ लगेच गुरवारपासून (1 मे) लागू होणार आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात अमूलचे जे सध्याचे दर आहेत, त्यापेक्षा दोन रुपयांनी प्रतिलीटर दूध महागलं आहे.
काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढल्याची माहिती समोर आली होती. गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे घराघरातील गृहिणींचे आर्थिक बजेटवर परिणाम पडलेला बघायला मिळाला. यानंतर आता दुधाच्या दरात प्रतिलीटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय अमूल कंपनीने घेतला आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट पुन्हा कोलमडण्याची शक्यता आहे.
अमूलकडून अधिकृतपणे याबाबत घोषणा करण्यात आली आहे. अमूल दुधाच्या किंमतीत देशभरात प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भाववाढ लगेच गुरवारपासून (1 मे) लागू होणार आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात अमूलचे जे सध्याचे दर आहेत, त्यापेक्षा दोन रुपयांनी प्रतिलीटर दूध महागलं आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यात अमूल ताजा दुधाचा चांगला खप आहे. सध्या अमूल ताजाच्या अर्धा लीटरच्या पिशवीवर 28 रुपये अशी छापील किंमत असते. हीच किंमत एका अर्धा लीटरच्या पिशवीवर 29 रुपये इतकी असणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी दूध घ्यायला जाणाऱ्या ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून दुधाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दर सहा महिन्यांनी दुधाचे दर वाढताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागतालाना दिसत आहे. प्रतिलीटर दोन रुपये जरी वाढवले आणि एका कुटुंबाला दर दिवशी एक लीटर दूध जरी लागत असले तरी त्या कुटुंबाला आता दर महिन्याला 60 रुपये अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. यामुळे सर्वसामान्यांचं बचतीचे आर्थिक गणित कोलमडतं. यामुळे दूधाच्या दरावर नियंत्रण आणावं, अशी मागणी सातत्याने केली जाते. आतादेखील तशी मागणी केली जाऊ शकते. याबाबतच्या मागणीवर काही तोडगा निघतो का? ते देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे.

