Mumbai Kalachowki Girl Dies of Electric Shock : मुंबईच्या काळाचौकी येथील महागणपती येथे 5 जणांना विद्युत शॉक लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत आठ वर्षीय चिमुलकीचा मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना काय?
प्राथमिक माहितीनुसार, काल शनिवारी रात्री उशीरा काळाचौकीचा महागणपतीच्या मंडप परिसरात ही घटना घडली. काल मध्यरात्री भाविक मोठ्याप्रमाणावर काळाचौकीचा महागणपतीच्या दर्शनाला आले होते. याठिकाणी वीजेचा झटका लागून पाच जण जखमी झाले. यामध्ये लहान मुलांचा आणि तरुणांचा समावेश आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं. दुर्घटनेत जखमी झालेल्या पाच जणांना तातडीने जवळच्या मसीना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. तर प्रकृती गंभीर असलेल्या एका मुलीला उपचारासाठी परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Maharashtra Rain Forecast: राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; कोणत्या भागांत कोसळणार? हवामान खात्याचा ताजा अंदाज
आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
वीजेचा झटका लागून जखमी झालेल्यामध्ये दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. हे सर्वजण 8 ते 20 या वयोगटातील आहेत. जखमींपैकी आठ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मसीना रुग्णालयात नेण्यात आलेल्या तिघांवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्वजण याच परिसरात वास्तव्याला होते. या सर्व मुलांना वीजेचा झटका कसा लागला, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, या दुर्घटनेमुळे लालबाग-परळमध्ये दु:खाचं सावट पसरलं आहे.
… पुढच्या वर्षी लवकर या
गेले सहा दिवस घरोघरी निर्माण झालेल्या चैतन्यपूर्ण वातावरणाला आता पुढच्या गणेशोत्सवापर्यंत अल्पविराम मिळाला आहे. शनिवारी भावपूर्ण वातावरणात भाविकांनी गौरी-गणपतींना निरोप दिला. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित करण्याचे निर्बंध असल्याने एरवी चौपाटीवर उसळणारी गर्दी कृत्रिम तलावांवर उसळली होती. चौपाटीवर मावळत्या सूर्याच्या साक्षीने वाळूमध्ये मूर्ती ठेवून केली जाणारी आरती, कृत्रिम तलावांच्या परिसरामध्ये भाविकांनी केली. त्यामुळे मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत समुद्रामध्ये मूर्ती विसर्जनाचा भावपूर्ण क्षण कुठेतरी हरवल्याचीही खंत भाविकांकडून व्यक्त करण्यात येत होती.
Weather Update : मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु, शेतकऱ्यांना दिलासा नाहीच, हवामान विभागाने अखेर घोषणा केलीच; वाचा पावसाचा अंदाज नेमका काय?
फटाके फोडत भाविकांची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
सकाळपासून घरोघरी महाआरती आणि उत्तरपूजा करून गणपती बाप्पा आणि गौरी मातांना नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर पारंपारिक वेशभूषेत, गुलालाची उधळण करत आणि टाळ-मृदंगाच्या तालावर नाचत भाविक विसर्जन मिरवणुकीसाठी घराबाहेर पडले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरामध्ये आणि फटाके फोडत भाविकांनी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. प्रत्यक्ष विसर्जन स्थळी आल्यानंतर मात्र जयघोषाचा हा आवाज कमी झाला होता. यंदा घरगुती गणपती विसर्जनासाठी दादर, गिरगाव यासारख्या परिसरात संध्याकाळपर्यंत ढोलताशांचा आवाज फारसा नव्हता, असे निरीक्षण स्थानिकांनी नोंदवले.
