• Sun. Sep 20th, 2026

Harshwardhan Sapkal: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

मुंबई : राज्यातील अनेक भागांत दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे, दीड महिन्यापासून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही, शेतातील पिके करपून गेली आहेत; परंतु महायुती सरकारचे त्याकडे लक्ष नाही. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत, सरसकट कर्जमाफी द्यावी; अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी सरकारला दिला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळाबाबत फक्त चर्चा झाली, ठोस निर्णय घेतला नाही, पालकमंत्री शेतकऱ्यांकडे फिरकले नाहीत. शेतकरी संकटात असताना सरकार वेळकाढूपणा करीत आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

Pankaja Munde: तिकडे कोणी काजू, बदाम खाण्यासाठी गेले नव्हते; पंकजा मुंडेंनी विरोधकांना फटकारलं‘शेतकऱ्यांना पैसेच नाहीत’

भाजप महायुती सरकार संवेदनशील नाही. शेतकरी संकटात होरपळून निघाला असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कुंभमेळ्यात सीसीटीव्ही बसवण्यासाठी सरकार ३५० कोटी रुपये खर्च करते, परंतु शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची गरज असताना तोही निर्णय घेतला नाही.

‘महायुतीबद्दल ल चीड’

लोकांमध्ये महायुती सरकारबद्दल प्रचंड चीड आहे; परंतु सत्ताधारी निर्ढावलेले आहेत. त्यांना शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे काहीही देणेघेणे नाही. यांना फक्त भ्रष्टाचार व टक्केवारी यामध्येच स्वारस्य आहे. अजून वेळ गेलेली नाही, सणासुदीचे दिवस आहेत, सरकारने तत्काळ दुष्काळ जाहीर करून दसऱ्याच्या आधी भरीव मदत द्यावी,’ असे सपकाळ म्हणाले.

Maharashtra TimesUPI Charges On Rail Tickets: रेल्वे प्रवाशांवर ‘यूपीआय’ शुल्कभार; 2000 रुपयांपुढील तिकीट-पाससाठी 5 रुपयांहून अधिक भुर्दंड‘वाढदिवसाला दिवे का?’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षांत काय दिवे लावले; म्हणून त्यांच्या वाढदिवसाला दिवे लावण्याचे आवाहन केले होते? मोदींच्या काळात तरुणांना नोकऱ्या नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी संकटात आहे, अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे, महागाई गगणाला भिडली आहे, अशा परिस्थितीत वाढदिवस काय साजरा करता,’ असा प्रश्नही त्यांनी केला.

हा आत्मपूजेचाच प्रकार
‘नागरिक संकटात असताना वाढदिवस साजरे करणे हे अशोभनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सोने खरेदी करू नका, विदेशात जाऊ नका, तेल कमी वापरा, काटकसर करा, असे आवाहन केले होते आणि आपल्या वाढदिवसाला तेलाचे दिवे लावा, असे सांगितले, हा प्रकारच संतापजनक आहे. आत्मपूजा करण्याचा हा प्रकार आहे. देशाला इतका खोटारडा, रंग बदलणारा पंतप्रधान मिळाला हे दुर्दैव आहे,’ अशी टीका त्यांनी केली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed