• Fri. Sep 18th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

धक्कादायक! प्रियकराने लग्नाच आमिष दाखवल अन् बुधवारपेठेतील कुंटनखान्यात विक्री केली

बुधवार पेठेतील एका कुंटनखान्यात विवाहित प्रेयसीची तिच्या सहा वर्षाच्या मुलीसह पाच लाख रुपयांत विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. विक्री केलेली महिला ही आसाम येथील आहे. ‘तुझ्याशी लग्न करतो, असे सांगून प्रियकराने तिला पुण्यात आणले होते. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात प्रियकर शफीकल आबूल नासूर याहीद आलम (रा. आसाम), कुंटणखाना चालक पापा शेख, अधुग शिवा कामली (दोघे रा. बुधवार पेठ) आणि पोलिस दलातील अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी २५ वर्षीय पोडितेने तक्रार दिली आहे हा प्रकार जानेवारी २०२५ या कालावधीत घडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed