सन २०२३-२४मध्ये भारताने बांगलादेशला ७.२४ लाख टन कांदा निर्यात केला होता. भारताच्या त्या वर्षातील एकूण १७.१७ लाख टन कांदा निर्यातीपैकी बांगलादेशचा वाटा ४२ टक्के होता. त्यामुळे बांगलादेश ही भारतीय कांद्यासाठी अत्यंत महत्त्वाची पारंपरिक बाजारपेठ राहिली आहे. मात्र, आता बांगलादेशने कांदा उत्पादनात वाढ केली असून, देशांतर्गत गरज भागवून उरलेला कांदा परदेशी बाजारपेठेत पाठविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बांगलादेशने श्रीलंकेला कांदा आणि बटाटा निर्यात करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त समोर आले आहे. उत्पादकांना चांगला भाव मिळावा आणि द्विपक्षीय व्यापार वाढावा, हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
Nashik Accident : पहिल्यांदाच गणपती बसवण्याचा उत्साह, पण आनंदावर विरजण, बाप्पाच्या आगमनावेळी कृष्णाचा अपघाती मृत्यू; जिवाभावाचा मित्र गेल्यानं सर्वच ढसाढसा रडलेधोरणबदलांची चिंता
भारतीय कांदा निर्यातदारांकडून केंद्र सरकारच्या निर्यात धोरणातील वारंवार बदलांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. २०२३मध्ये भारताने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले होते. त्यानंतर डिसेंबर २०२३ ते मे २०२४ या काळात निर्यातबंदीही लागू करण्यात आली. नंतर निर्यात पुन्हा सुरू करताना किमान निर्यात मूल्य आणि शुल्कासारख्या उपाययोजना करण्यात आल्या. मार्च २०२५मध्ये केंद्राने २० टक्के निर्यात शुल्क हटविण्याची घोषणा केली.
भारतीय कांदा बाजारपेठ धोक्यात?
बांगलादेशाच्या उत्पादनक्षमतेत वाढ होऊन तो भविष्यात नियमित कांदा निर्यात दार बनला, तर दक्षिण आशियातील कांदा व्यापाराचे समीकरण बदलू शकते. विशेषतः श्रीलंका, बांगलादेश आणि इतर आशियाई बाजारपेठांमध्ये भारतीय कांद्याला बांगलादेशकडून स्पर्धा निर्माण होऊ शकते. भारतीय कांद्याची निर्यात महाराष्ट्रातील नाशिक, लासलगाव, पिंपळगाव, येवला, चांदवड आदी बाजारपेठांशी जोडलेली आहे. त्यामुळे परदेशी मागणीत घट झाली किंवा पर्यायी पुरवठादार आले, तर त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारभावावरही होऊ शकतो. केंद्र सरकारने निर्यातदार, व्यापारी आणि उत्पादक यांच्याशी चर्चा करून दीर्घकालीन, स्थिर आणि बाजारपेठाभिमुख कांदा निर्यात धोरण आखावे, अशी मागणी जोर धरत आहे.
Nashik Crime : ‘जेवणात पिठलं का बनवलं नाही’; लेकराचं बायकोसोबत कडाक्याचं भांडण, आई सोडवायला जाताच आक्रित घडलं, पोटच्या गोळ्यानं माऊलीला संपवलंभारताकडून मोठ्या प्रमाणावर कांदा घेणाऱ्या बांगलादेशाने आता स्वतःच्या उत्पादनाच्या जोरावर श्रीलंकेसारख्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची तयारी केली आहे. भारताच्या कांदा निर्यात धोरणातील वारंवार बदलांचा दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकारने याबाबतीत धरसोड धोरणात बदल करावा. -प्रवीण कदम, कांदा निर्यातदार, लासलगाव
