Sangli Tasgaon Accident News : सोनाली जाधव या मणेराजुरी येथील एका शाळेत शिक्षिका आहेत. पत्नीला आणण्यासाठी सागर जाधव हे मुलगी हर्षिताला घेऊन दुचाकीवरून गेले होते.
सांगली तासगाव अपघात वडील मुलीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : तासगाव-मनेराजुरी रस्त्यावर वासुंबे हद्रीतील ब्रम्हनाथ मंदिराजवळ काल बुधवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. रस्त्याच्याकडेला थांबलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील वडील आणि त्यांच्या अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत व्यक्तीची पत्नी सोनाली जाधव गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात पती सागर जाधव (रा. चिंचणी) आणि त्यांची चार वर्षाची मुलगी हर्षिता यांचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.
नेमका कसा झाला अपघात?
सागर जाधव हे तासगाव तालुका फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते बाबुराव जाधव यांचे पुत्र असल्याची माहिती आहे. तर पत्नी सोनाली जाधव या मणेराजुरी येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सागर जाधव हे पत्नी सोनाली जाधव व मुलगी हर्षिता यांना घेऊन तासगाव-मनेराजुरी रस्त्यावरील आयडियल इंलिश स्कूल परिसरातून तासगावच्या दिशेने दुचाकीवरुन येत होते. यावेळी वासुंबे हद्रीतील ब्रम्हनाथ मंदिराजरळ रस्त्यावर थांबलेल्या पिकअप वाहनाला त्यांच्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली.
Mumbai Crime : आई-बाबांच्या बेडरुममध्ये मुलाने सिक्रेट कप्पा बनवला, मुंबईतील मोलकरणीने डाव साधला, नवऱ्याच्या बाईकसाठी 10 लाख उडवले
पत्नीचीही प्रकृती गंभीर
धडक इतकी भीषण होती की सागर जाधव आणि त्यांच्या चार वर्षीय चिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. गंभीर जखमी झालेल्या सोनाली जाधव यांना तातडीने उपचारासाठी मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. या हृदयद्रावक अपघातामुळे चिंचणीसह तासगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. घटनेची अधिक माहिती तसेच अपघातांचं नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
आटपाडी प्रकरणी वृद्ध नराधमास फाशीची शिक्षा
आटपाडी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमास दोषी धरून न्यालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. शिवाजी कोंडीबा काळेल असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश रविकरण भागवत यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आरती आनंद देशपांडे-साठविलकर यांनी बाजू मांडली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा