पर्यटन विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. नागपूरची वाढती पर्यटन क्षमता, मध्य भारतातील भौगोलिक मध्यवर्ती स्थान, समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि आसपासची वनसंपदा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक आर्थिक विकासाला चालना देणे, पर्यटकांची संख्या वाढवणे आणि पर्यटनाशी निगडित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Amravati Doctor Death : अमरावतीत 22 वर्षीय तरुण डॉक्टरचा गूढ अंत, आई-वडिलांनी दिली धक्कादायक माहिती; व्हिसेरा रिपोर्टनंतर उलगडा होणारमहाराष्ट्राच्या पर्यटन धोरण-२०१६ अंतर्गत नागपूरला यापूर्वी ‘विशेष पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आले होते. जिल्ह्याचे आर्थिक आणि गैरआर्थिक महत्त्व लक्षात घेऊन त्या वेळी ही घोषणा करण्यात आली होती. आता त्याच पुढील टप्प्यात नागपूरला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेमुळे पर्यटनस्थळांच्या विकासासाठी अधिक सुसंगत नियोजन, पायाभूत सुविधा, पर्यटकाभिमुख उपक्रम आणि स्थानिक सहभाग यांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
नागपूर जिल्ह्याला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला आहे. गोंड राजे आणि भोसले राजघराण्यांच्या काळातील वास्तू, वाकाटककालीन मंदिरे, किल्ले, प्राचीन स्थळे आणि सांस्कृतिक परंपरा जिल्ह्याच्या पर्यटन ओळखीला वैशिष्ट्य देतात. रामटेक येथील प्राचीन राम मंदिर, खिंडसी परिसरातील जलक्रीडा सुविधा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींशी निगडित दीक्षाभूमी ही स्थळे देशभरातील पर्यटक व भाविकांना आकर्षित करतात.
वन्यजीव पर्यटनाच्या दृष्टीनेही नागपूरचे महत्त्व विशेष आहे. ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या आसपास पेंच राष्ट्रीय उद्यान, उमरेड-कऱ्हांडला वन क्षेत्र तसेच इतर महत्त्वाची जंगलपट्टी आहे. वाघ, वन्यजीव, जंगल सफारी आणि निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने या भागात मोठी क्षमता आहे. यासोबतच जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसर, लोककला, हस्तकला, आदिवासी लोकनृत्यांची परंपरा आणि स्थानिक खाद्यसंस्कृती यांमुळे पर्यटनाचे वैविध्य अधिक समृद्ध होते.
पर्यटन विकासाशी संबंधित सुविधा उभारणी, पर्यटकांसाठी माहिती व्यवस्था, वाहतूक-संपर्क सुधारणा, स्थानिक मार्गदर्शक, निवासव्यवस्था, हस्तकला बाजारपेठ आणि स्थानिक उत्पादने यांना या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Accident News: भरधाव महिला कारचालकाचा थरार, कारची एसयूव्हीला धडक, तीन चिमुकल्यांसह सात जखमी; मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोपअसे वाढणार महत्त्व
नागपूरला मिळालेला ‘पर्यटन जिल्हा’ दर्जा हा केवळ प्रशासकीय उल्लेख नसून, जिल्ह्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासाला दिशा देणारा निर्णय मानला जात आहे. या दर्ज्यामुळे पर्यटनस्थळांचे संवर्धन, पायाभूत सुविधांची उभारणी, स्थानिक रोजगारनिर्मिती, पर्यटकांसाठी सुविधा आणि जिल्ह्याच्या पर्यटन ब्रँडिंगला चालना मिळू शकते. ऐतिहासिक स्थळे, धार्मिक केंद्रे, वन्यजीव क्षेत्रे आणि लोकसंस्कृती यांना एकत्रितपणे पर्यटन साखळीत जोडण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.
